शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मदतीच्या योजना एकत्र होतील का?

By admin | Updated: March 23, 2016 03:53 IST

बलात्कार, अ‍ॅसिड प्रकरणातील पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य सरकारच्या अस्तित्वात असलेल्या मनोधैर्य योजना व पीडित नुकसानभरपाई योजना, या दोन्ही योजना एकत्र करणे शक्य आहे का?

मुंबई : बलात्कार, अ‍ॅसिड प्रकरणातील पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य सरकारच्या अस्तित्वात असलेल्या मनोधैर्य योजना व पीडित नुकसानभरपाई योजना, या दोन्ही योजना एकत्र करणे शक्य आहे का? या दोन्ही योजना एकत्र करण्याबाबत विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिली, तसेच गंभीर केसेसमधील पीडितांना योजनांच्या पूर्वलक्ष्यी प्रभावाने नुकसानभरपाई देता येणे शक्य आहे का? याचाही विचार करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला दिला.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बलात्कार व अ‍ॅसिड हल्ला पीडितांना आर्थिक मदत म्हणून सरकारने २१ आॅक्टोबर २०१४ मध्ये ‘मनोधैर्य योजना’ सुरू केली. त्यानंतर फौजदारी दंडसंहितेमध्ये केलेल्या सुधारणेनुसार २०१४ मध्ये ‘पीडित नुकसानभरपाई योजना’ सुरू करण्यात आली. मात्र, या योजना अंमलात येण्यापूर्वीच्या पीडितांना नुकसानभरपाई देण्यास सरकार नकार देत असल्याने, दोन पीडितांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठापुढे होती.‘सर्वोच्च न्यायालयाने १९९४ मध्येच अशा प्रकारच्या पीडितांसाठी नुकसानभरपाई देण्याची योजना अस्तित्वात आणण्याचे निर्देश सरकारला दिले होते. त्यानंतर, तब्बल २० वर्षांनी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले. त्यामुळे या दोघींनाही सरकारने नुकसानभरपाई द्यावी. सरकारने निदान केसचे गांभीर्य पाहून पीडितांना नुकसान भरपाई द्यावी,’ अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली. त्यावर सरकारी वकील मनकुँवर देशमुख यांनी आक्षेप घेतला. ‘संबंधित योजना अस्तित्वात आल्यानंतरच नोंदवलेल्या गुन्ह्यांमधील पीडितेला नुकसानभरपाई देण्यात येईल. राज्य सरकारने या दोन्ही योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केल्या, तर राज्याच्या तिजोरीला फटका बसेल. तेवढा निधी सरकारकडे उपलब्ध नाही. त्यामुळे या दोन्ही योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करणे अशक्य आहे,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. मनकुँवर देशमुख यांनी केला. खंडपीठाने गंभीर प्रकरणात या योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करणे शक्य आहे का? याचा अभ्यास करण्याची सूचनाही सरकारला केली. याचिकेवरील सुनावणी १३ जून रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)