शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जुना-नवा वाद उफाळणार?

By admin | Updated: March 3, 2017 01:31 IST

कार्यकर्त्यांना न्याय न दिल्याने निदान स्वीकृत सदस्यपदासाठी, तसेच शासकीय समित्यांवर संधी देण्याचा विचार व्हावा

पिंपरी : महापालिका निवडणुकीत क्षमता असूनही उमेदवारीत डावलले गेलेले, तीस वर्षांपासून पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय न दिल्याने निदान स्वीकृत सदस्यपदासाठी, तसेच शासकीय समित्यांवर संधी देण्याचा विचार व्हावा, असे साकडे भाजपातील नाराज गटाने थेट मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना घातले आहे.महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची उमेदवारी जाहीर झाली. त्यात ज्यांना डावलले त्यांनी पक्ष कार्यालयासमोरच नाराजी व्यक्त केली. पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्यानंतर निवडणुकीतही पक्षाचे काम केले. आता महापालिकेत एकहाती सत्ता आल्यानंतर हा जुना गट पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यांनी ३१ जणांची यादी तयार केली असून या यादीतील कोणत्याही तिघांना स्वीकृत सदस्यपदी संधी द्यावी, तसेच इतरांचा अन्य शासकीय समित्यांसाठी विचार करावा, असे या गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सूचित केले आहे. स्वीकृत सदस्यपदासह अन्य समित्यांवर संधी दिल्यास त्यांच्यावर झालेला अन्याय दूर होईल, अशी त्यांची भावना आहे. त्यांनी केलेल्या या मागणीमुळे आता पुन्हा जुना-नवा असा वाद उफाळून येणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत तीन नगरसेवक संख्या असलेल्या भारतीय जनता पार्टीने थेट ७७ नगरसेवकांपर्यंत मजल मारली आहे. काही महिन्यांपूर्वीच आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे हे भाजपामध्ये डेरेदाखल झाले. पक्षसंघटना मजबूत होईल. या दृष्टीने त्यांना प्रवेश देण्यात आले. मात्र, या प्रवेशामुळे भाजपाचे काही जुने पदाधिकारी अस्वस्थ झाले. महापालिका निवडणुकीत आपणाला कितपत संधी मिळणार याबाबत तेही साशंक होते. दरम्यान, आपण निष्ठावान असून, संधी मिळेल अशी त्यांना आशा होती. मात्र, उमेदवारी जाहीर झाली त्या वेळी त्यांची आशा फोल ठरली. वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलून काही दिवसांपूर्वीच पक्षात आलेल्यांना संधी देण्यात आल्याबाबत संताप व्यक्त केला. जुन्या गटातील पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठकही घेतली. जुन्या, नव्यांचा वाद समोर आला असतानाच जुन्या पदाधिकाऱ्यांना समजाविण्यात पक्ष पदाधिकाऱ्यांना यश आले. दरम्यान, आता महापालिका निवडणूकही पार पडली असून, घवघवीत यश संपादन केले आहे. भाजपाला ७७ जागा मिळाल्या असून, या संख्याबळानुसार स्वीकृत सदस्य पदाच्या पाचपैकी तीन जागा भाजपाच्या वाट्याला येतात. त्यामुळे या तीन जागांवर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी) >नगरसेवकांची संख्या : मूळचे भाजपचे कमीचनव्याने निवडून आलेल्या एकूण नगरसेवकांपैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत संख्या सोडली, तर भाजपाचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले सर्वच नगरसेवक इतर पक्षांतून आलेले आहेत. मूळ भाजपाचे असलेल्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्यपदी तरी जुन्या, निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे. अशातच शहरातील भाजपाच्या जुन्या ३१ कार्यकर्त्यांनी याबाबतची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. भाजपात ३० वर्षांपासून सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, असेही त्यामध्ये नमूद आहे. त्यामुळे आता भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाते, की नव्याने पक्षात आलेल्यांपैकी कोणाच्या तरी डोक्यावर स्वीकृतचा मुगुट चढविला जातो. याकडे लक्ष लागले आहे. स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीवरून जुन्या-नव्या गटाचा वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.