शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

...तर मोठ्या इमारतींमधील ओला कचरा उचलणार नाही, मुंबई मनपाचा इशारा

By admin | Updated: July 2, 2017 08:37 IST

ओला व सुका कचरा वेगळा करण्याची वारंवार ताकीद देऊनही मुंबईकर दाद देत नसल्याने महापालिका प्रशासनाने ब्रह्मास्त्र काढले आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.2 - ओला व सुका कचरा वेगळा करण्याची वारंवार ताकीद देऊनही मुंबईकर दाद देत नसल्याने महापालिका प्रशासनाने ब्रह्मास्त्र काढले आहे. त्यानुसार दररोज शंभर किलो व त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या संकुलांनी आपापल्या परिसरात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, असे पालिकेने कळवले होते. मात्र या नोटिशीकडेही कानाडोळा केल्यास २ आॅक्टोबरपासून ओला कचरा उचलणार नाही, असा इशाराच पालिकेने दिला आहे.

महापालिका मुख्यालयात शनिवारी पार पडलेल्या मासिक आढावा बैठकीत आयुक्त अजय मेहता यांनी हा निर्णय जाहीर केला. २० हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक चटई क्षेत्र त्याचबरोबर ज्या संकुलांमधून दररोज १०० किलो अथवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होत आहे अशा संकुलांनी आपापल्या परिसरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट संकुलातच लावण्याचे पालिकेने सूचित केले होते.
 
मात्र अनेक गृहनिर्माण संकुले या नोटिशीला केराची टोपली दाखवित आहेत. त्यामुळे कठोर पावले उचलण्याची तयारी पालिकेने केली आहे. त्यानुसार २ आॅक्टोबरपासून अशा संकुलांमधील ओला कचरा न उचलण्याचे आदेश शनिवारच्या बैठकीदरम्यान महापालिकेच्या घनकचरकचरा वर्गीकरणाचा कृती आराखडा
 
महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या स्तरावर दररोज किती कचरा गोळा होतो, त्याचे वर्गीकरण व त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावता येऊ शकते, याबाबत सविस्तर कृती कार्यक्रम १ आॅगस्टपर्यंत देण्याचे आदेश सर्व विभागस्तरीय सहायक आयुक्तांना शनिवारच्या बैठकीत देण्यात आले.
 
व्यवस्थापन खात्याला आयुक्तांनी दिले. तर विभाग स्तरावर सुक्या कचऱ्याचा लिलाव कशा प्रकारे करता येईल याबाबत अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) लवकरच योजना सादर करणार आहेत.
 
भाजी मंडईतील कचरा व्यवस्थापन-
 
महापालिका मंडयांमध्ये दिवसातून तीनवेळा साफसफाई केली जाते व तेथील कचरा उचलला जातो. हा कचरा ठरवून दिलेल्या ठिकाणीच टाकावा, असे आवाहन महापालिकेद्वारे वेळोवेळी करण्यात येत आहे.
 
याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होणाऱ्या भाजी मंडयांमध्ये तिथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट मंडईस्तरावरच लावण्यात येणार आहे. यासाठी सहायक आयुक्त (बाजार) यांनी ‘वेस्ट कन्व्हर्टर’ मंडयांमध्ये बसवावेत, असे आदेश बैठकीत महापालिका आयुक्तांनी दिले.