शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निधी कमी पडू देणार नाही- सवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 02:54 IST

कुपोषण निर्मूलनासाठी एकात्मिक बालविकास विभाग व आरोग्य विभागाला आदिवासी विभागाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही

विक्रमगड : पालघर जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी एकात्मिक बालविकास विभाग व आरोग्य विभागाला आदिवासी विभागाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी वाडा येथील भाजपा कार्यालयात विक्रमगडच्या पत्रकारांशी संवाद साधतांना दिली. तसेच कुपोषण निर्मूलन, सार्वजनिक आरोग्य व रोजगार यासाठी शासनाकडून विशेष योजना राबविण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. औद्योगिक कारखान्यांच्या डी झोनच्या सवलती कमी झाल्याने काही कारखाने स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत. या पाशर््वभूमीवर ही कारखानदारी टिकविण्यासाठी उद्योगांना विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना देण्यात आलेल्या विशेष पॅकेजच्या धर्तीवर पॅकेज देण्यासाठी व डी झोनमधील सवलती वाढविण्यासाठी आपण पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील रस्ते, पुल शासकिय इमारती व इतर योजनांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येत आहे. तसेच पालघर येथील जिल्हा मुख्यालयातील सर्व विभाग एका छताखाली आणण्यासाठी इमारतींचे काम लवकरच सुरू करणार असून पालघर येथे जिल्हा प्रशासनाचे २४ नवीन विभाग सुरू झाले असून उर्विरत विभागही लवकरच सुरू करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. आदिवासी विकास विभागाच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश देवून दर्जेदार शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र पाचगणी सारख्या लांब अंतराच्या शाळांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी राहण्यासाठी नाखूष असल्याचे आढळले आहे. या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातीलच नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेता यावे यासाठी जिल्ह्यातील नामांकित शाळांनी आपले प्रस्ताव आदिवासी विभागाकडे द्यावेत, असे आवाहनही यावेळी बोलतांना विष्णू सवरा यांनी केले आहे.चाळीस किमी अंतरावर असलेल्या सर्व आश्रमशाळांकरीता मध्यवर्ती किचन करून ते ऐकाचवेळी सर्व ठिकाणी पुरविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच जातपडताळणीमधील लबाडी रोखण्यासाठी आता आॅनलाइन सेवा सुरु केल्याने खोटी प्रमाणपत्र घेता येणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. (वार्ताहर)>विक्रमगड-वाडा-भिवंडी पुलांची लवकरच उभारणीविक्र मगड व वाडा तालुक्यातील अंभई-केव या गावांना जोडणाऱ्या पुलासाठी सहा कोटी ५० लाख तर भिवंडी-वाडा तालुक्यातील उचाट-कुंदे या गावांना जोडणाराऱ्या पुलासाठी तीन कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.