शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी एकत्र येणार नाही - संजय राऊत

By admin | Updated: February 15, 2017 19:59 IST

आम्ही केवळ सत्तेसाठी एकत्र येणार नाही असे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले

ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 15 -  महापालिकेच्या निकालानंतरही भाजप-सेना एकत्र येण्याची शक्यता नाही. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर तलवारी बाहेर निघाल्या आहेत. त्या आता म्यान होण्याची शक्यता नाही, असे सांगत आम्ही केवळ सत्तेसाठी एकत्र येणार नाही असे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले. लक्ष्मीनगर चौकात बुधवारी राऊत यांनी शिवसेनेच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुंबई नेहमीच शिवसेना जिंकत आली आहे. या वेळीही जिंकेल. मोदींची भावनेची लाट आली आणि निघून गेली. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारी रोजी युती तोडण्याची घोषणा केली. तेव्हापासूनच सरकारचा नोटीस पिरेड सुरू झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले. संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो. वैद्य यांनी आपले मार्गदर्शन ज्यांना गरज आहे त्यांनाच द्यावे. भाजपमध्ये पोलीस भरती सारखी गुंड भरती सुरू आहे. वैद्य यांनी आधी त्यांना मार्गदर्शन करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. उत्तर प्रदेशात शिवसेनेचे पाच ते दहा आमदार विजयी होतील, असा दावा त्यांनी केला. नागपूरचे काय शिकागो झाले का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी नागपूरकड लक्ष द्यावे, नंतर मुंबईकडे पहावे. मुंबईची तुलना पाटण्याशी करण्यापेक्षा गुन्हेगारीत नागपूर बिहारपेक्षाही पुढे गेले आहे, अशी टीका करीत मग नागपूरचे काय शिकागो झाले का, असा खोचक सवालही त्यांनी केला. विदर्भात  मिशन ५०   विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळावर लढताना शिवसेना विदर्भात ह्यमिशन ५०ह्ण हाती घेऊन काम करेल. ५० जागांवर लक्ष केंद्रीत करून कान केले जाईल. युतीमुळे आमचे विदर्भात नुकसान झाले. नाहीतर आणखी शिवसेना वाढली असती, असा आरोपही त्यांनी केला.