शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

एमसीव्हीसीचा अभ्यासक्रम बंद करणार नाही - निलंगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 4:33 AM

एमसीव्हीसी अभ्यासक्रम बदलणार, आयटीआयमध्ये रुपांतरण होणार अशा सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम देत राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी

भालचंद्र येडवेलातूर : एमसीव्हीसी अभ्यासक्रम बदलणार, आयटीआयमध्ये रुपांतरण होणार अशा सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम देत राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी एमसीव्हीसी अभ्यासक्रम रोजगाराभिमुख असून, त्याच्या बदलाचा वा रुपांतरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट, अभ्यासक्रमाच्या बळकटीसाठी उच्चस्तरीय समिती गठित करणार असल्याचे सांगितले.निलंगेकर म्हणाले, महाराष्ट्रात या अभ्यासक्रमाची परिस्थिती चांगली असून, इ.स. २०१७ मध्ये या अभ्यासक्रमासाठी एकूण प्रवेश क्षमता असलेल्या ७६ हजार १८६ पैकी ५८ हजार ८८० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. प्रवेश क्षमतेच्या तुलनेत परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ७७.२८ इतकी आहे. नुकताच या अभ्यासक्रमात कालानुरुप बदल करीत ३० अभ्यासक्रमाचे २० मध्ये रुपांतर करण्यात आले आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून रोजगारक्षम अभ्यासक्रम बनविण्यात आले असल्याचे ते म्हणाले.दरम्यान, या अभ्यासक्रमाला नवसंजीवनी देण्यासाठी शासनस्तरावर वेगवेगळ्या बैठका घेऊन नियोजन करणे सुरू असताना काही वर्तमानपत्रांतून या अभ्यासक्रमाच्या बाबत उलटसुलट बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या संदर्भात कौशल्य विकास व उद्योजक कार्यालयाने म्हटले आहे, सदर बातम्यांमध्ये कसलेही तथ्य नसून, कोणतेही अभ्यासक्रम बंद होणार नाहीत. शिवाय, हे सर्व अभ्यासक्रम पूर्ववत चालू राहतील, असेही पाटील म्हणाले.दर्जा वाढविण्याबाबत चाचपणीएमसीव्हीसीच्या अभ्यासक्रमाचा दर्जा वाढविण्यासाठी चाचपणी सुरू असून, या संदर्भात शासनस्तरावर बैठका घेण्याचे सत्र सुरू आहे. महाराष्ट्रात या अभ्यासक्रमाची परिस्थिती चांगली असून, अनेकजण स्वत:चा व्यवसाय करतात. बहुतांश विद्यार्थी हे उद्योजक झाले असल्याने या अभ्यासक्रमावर कसलेही गंडांतर येणार नाही, असेही संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले.