शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेससोबत जाणार नाही

By admin | Updated: February 26, 2017 02:00 IST

मतदारांनी पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजपाला कौल दिला आहे. त्यामुळे सत्तेसाठी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचे आहे त्यांना रोखणारही

मुंबई : मतदारांनी पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजपाला कौल दिला आहे. त्यामुळे सत्तेसाठी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचे आहे त्यांना रोखणारही नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला. राज्यातील १० महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले. त्यानिमित्त पक्षातर्फे राज्यभर जल्लोष करण्यात आला. नरिमन पॉर्इंट येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अन्य भाजपा नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई महापालिकेत ८४ जागांसह शिवसेना प्रथम क्रमांकावर तर ८२ जागांसह भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी शिवसेना आणि भाजपासमोर पुन्हा युती करणे अथवा काँग्रेसचाच पर्याय आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपला अजेंडा हा फक्त विकासाचा आहे. पारदर्शकतेच्या मुद्यावर कदापि तडजोड करणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचे आहे त्यांना रोखणारही नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भाजपाचे यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वासाच्या लाटेचे आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशात प्रामाणिक राजकारण सुरू केल्यामुळे देशात जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.ही विश्वासाची ही लाट आहे आणि ती कधीच ओसरणार नाही. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे या सर्व पक्षांचे जितके नगरसेवक निवडून आले त्याहून जास्त भाजपाचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष बनला असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)