शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर श्रीमंतां’साठी आयकराचा नवा दर येणार?

By admin | Updated: February 29, 2016 04:27 IST

केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटलींच्या सोमवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात एक कोटीपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ‘सुपर-श्रीमंतां’साठी आयकराचा नवा दर असण्याची दाट शक्यता आहे

सोपान पांढरीपांडे,  नागपूरकेंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटलींच्या सोमवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात एक कोटीपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ‘सुपर-श्रीमंतां’साठी आयकराचा नवा दर असण्याची दाट शक्यता आहे. सध्या भारतात असे ८३००० ‘सुपर-श्रीमंत’ आहेत व नवा दर ३५ ते ४० टक्के असू शकतो.इतर देशांच्या विशेषत: ‘ब्रिक्स’ देशांच्या तुलनेत भारतात व्यक्तिगत आयकराचे सर्वोच्च दर माफक आहेत. याशिवाय सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) आणि कर महसूल याचे प्रमाण (टॅक्स टू जीडीपी रेशो) कमी आहे. त्यामुळे भारतात आयकराचे दर वाढविण्यासाठी भरपूर वाव असल्याचे सूतोवाच पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रमणियन यांनी शुक्रवारी केले आहे.भारतात सध्या आयकराचा सर्वोच्च दर ३४.५० टक्के आहे व तो एक कोटीपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांनाच द्यावा लागतो. इतर देशात आयकराचे सर्वोच्च दर असे आहेत :- चीन- ४५ टक्के, ब्राझील- २७.५० टक्के, रशिया- १३ टक्के, दक्षिण आफ्रिका - ४१ टक्के, आणि अमेरिका- ५५.९० टक्के.याचबरोबर भारतात सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त १७.७० टक्के कर महसूल मिळतो तर चीनमध्ये हे प्रमाण २२ टक्के आहे, ब्राझीलमध्ये ३४.४० टक्के, रशियात १९.५० टक्के आणि दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेत प्रत्येकी २६.९० टक्के आहे. भारतामध्ये आर्थिक प्रगतीमुळे व सातव्या वेतन आयोगामुळे जनतेची क्रयशक्ती वाढली आहे त्यामुळे कराचे दर वाढू शकतात. परंतु हा बोझा १० लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या मध्यमवर्गीयांवर टाकण्यापेक्षा ८३,००० ‘सुपर श्रीमंतां’वर पडण्याची अधिक शक्यता आहे. कारण सध्या १० लाख उत्पन्न असणाऱ्यांना ३०.९० टक्के आयकर द्यावा लागतो तर त्यांच्यापेक्षा १० पट अधिक उत्पन्न असणाऱ्या ‘सुपर श्रीमंतां’ना फक्त ३.६० टक्के अधिक आयकर लागतो. ही तफावत अधिक वाढविण्यासाठी ‘सुपर श्रीमंतांसाठी’ ३५ ते ४० टक्के दराची नवी श्रेणी येण्याची शक्यता आहे.भारतात असलेला कंपनी कराचा ३० टक्के दर इतर देशांच्या तुलनेत माफक आहे म्हणून त्यात बदल होण्याची शक्यता कमी आहे. इतर देशातील कंपनी कराचे दर असे आहेत, चीन-२५ टक्के, ब्राझील- ३४ टक्के, रशिया- २० टक्के, दक्षिण आफ्रिका- २८ टक्के आणि अमेरिका ३५ टक्के.