शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई सेंट्रल आगार बंद होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2016 01:57 IST

दक्षिण मुंबईकरांसह अनेकांना सोयीस्कर पडणारा आणि एसटी मुख्यालयाला लागूनच असलेले सर्वांत जुने मुंबई सेन्ट्रल येथील एसटीचे आगार बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या

मुंबई : दक्षिण मुंबईकरांसह अनेकांना सोयीस्कर पडणारा आणि एसटी मुख्यालयाला लागूनच असलेले सर्वांत जुने मुंबई सेन्ट्रल येथील एसटीचे आगार बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आगारातून चालवण्यात येणाऱ्या बसेसना मिळणारा अल्प प्रतिसाद, खर्च आणि दादरपुढे येणाऱ्या एसटी बसेसमुळे होणारी वाहतूक कोंडी हे प्रमुख कारण पुढे केले जात आहेत.१९९१च्या महसूल संरचनेनुसार प्रत्येक तालुक्यात एसटीचे आगार उभारण्यात आले. वाहतूकीचे अन्य पर्याय उपलब्ध झाल्याने, त्यातच प्रवासी कमी होत गेल्याने आणि वाढलेला खर्च यामुळे आगारांचे भारमान हे कमी होत गेले.त्यामुळे खर्च कमी भारमान कमी असलेल्या आगारांतील बस सेवा बंद करुन त्या अन्य आगारांत वळवण्याचे धोरण महामंडळाने अवलंबविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई सेन्ट्रल आगारातील लांब पल्ल्याची वाहतूक अन्य आगारात वळवण्यात येत आहेत. या आगारातून दिवसाला जवळपास एक हजार बसेसचे वेळापत्रक हाताळत असताना आता हा आकडा ७५० बसेसपर्यंत आला आहे. सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत दादरपुढे अवजड वाहनांना बंदी आहे.बसेस दादरच्या पुढे येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून दादरपुढे एसटी बस न आणण्याची सातत्याने मागणी केली जात असल्याचेही कारण पुढे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)परळ, कुर्ला येथील पर्यायमुंबई सेंट्रलमधून सुटणाऱ्या कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या बस फेऱ्या या परळ आगारातून, खान्देश व मराठवाड्याच्या बसेस या कुर्ला नेहरु नगर आगारातून सोडण्याचे नियोजन सुरू आहे. मुख्यालयाचे नूतनीकरणमुंबई सेन्ट्रलमधील एसटी मुख्यालयाचे नूतनीकरण केले जाणार आहे. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च येणार आहे. मात्र त्याआधी स्ट्रक्चरल आॅडिट केले जाईल. त्यात इमारत चांगली असेल तरच नूतनीकरण केले जाईल.आगारांतील फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करण्यावर आम्ही भर देत आहोत. एकाच आगारातून एकाच मार्गावर दहा फेऱ्या सुटत असतील आणि त्याला प्रतिसाद नसेल तर अन्य फेऱ्या बंद केल्या जात आहेत. आणखी पडताळणी करत आहोत. - रणजित सिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक, एसटी