शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील काही सामने हलवणार?

By admin | Updated: April 13, 2016 02:16 IST

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर किंग्स इलेव्हन पंजाबने नागपूरमधून आयपीएलचे तीन सामने मोहाली येथे हलवण्याची तयारी दर्शवल्यानंतर उच्च न्यायालयाने

मुंबई : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर किंग्स इलेव्हन पंजाबने नागपूरमधून आयपीएलचे तीन सामने मोहाली येथे हलवण्याची तयारी दर्शवल्यानंतर उच्च न्यायालयाने पुण्यातील काही आयपीएल सामने अन्यत्र हलवता येतील का, अशी विचारणा बीसीआयकडे करत उत्तर देण्याचे निर्देश मंगळवारी दिले. बीसीसीआय मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ सहाय्यता निधीमध्ये काही निधी जमा करणार का, लाखो लिटर पाणी खेळपट्टीवर उधळाणारी बीसीसीआय तेवढेच पाणी दुष्काळग्रस्त गावांना पुरवणार का, अशी विचारणाही न्यायालयाने केली.राज्यात भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळ असताना सुमारे ६० लाख लिटर पाणी आयपीएलच्या सामन्यांदरम्यान खेळपट्टीच्या देखभालीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका ‘लोकसत्ता मुव्हमेंट’ या एनजीओने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती. बीसीसीआयतर्फे ज्येष्ठ वकील रफीक दादा यांनी मुंबई, पुणे येथे होणाऱ्या १७ सामन्यांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्यात येईल, अशी माहिती उच्च न्यायालयाला दिली. ‘रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब’ म्हणजेच महालक्ष्मी रेसकोर्स आयपीएल सामान्यांसाठी दररोज सात ते आठ टँकर्स पाणी देईल. पुण्यातही अशाच प्रकारे पाणी देण्यात येईल. महालक्ष्मी रेसकोर्स प्रक्रिया करत असलेले सांडपाणी थेट समुद्रातच सोडते, त्याऐवजी हे पाणी आयपीएलसाठी देण्यात येईल,’ अशी माहिती अ‍ॅड. रफीक दादा यांनी उच्च न्यायालयाला दिली. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात महसूल बुडत असल्याचे म्हटले आहे. ‘राज्यात अशी स्थिती असतानाही सरकारला महसूलाचे पडले आहे. लोकांना त्रास होऊ दे,’ अशी चपराक उच्च न्यायालयाने सरकारला हाणली. (प्रतिनिधी)शरद पवारांना टोलामाजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मध्यस्थी करून महालक्ष्मी रेसकोर्सला मुंबई व पुण्यामधील आयपीएल सामन्यांसाठी पाणी देण्याची सूचना केली. त्याची दखल घेत ‘संबंधित मंत्री माजी कृषिमंत्री होते आणि ते क्रिकेटसाठीही काम करत आहेत. ते जर खेळपट्यांसाठी पाणी मिळवून देऊ शकतात, तर ते काहीही करू शकतात,’ असा टोला खंडपीठाने लगावला.- मुंबई पालिकेच्या हद्दीतील विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याची माहिती पालिकेने मंगळवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाला दिली.