शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपींचे परवाने होणार रद्द?

By admin | Updated: June 9, 2016 04:16 IST

आपण जर पकडले गेलात तर आपला वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पंकज रोडेकर,

ठाणे- सावधान... दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांनो, सावधान... आपण जर पकडले गेलात तर आपला वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर आपले नावही ठाणे शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होऊ शकते. त्यामुळे दाऊ पिऊन वाहन चालवायचे की नाही, हे आपणच आपले ठरवायचे आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी मद्यपींना धडा शिकवण्याचा हा अनोखा उपाय ठाणे शहर पोलिसांनी अवलंबल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरवर्षी नव्या वर्षाची सुरूवात अपघातविरहीत व्हावी, यासाठी वाहतुक शाखेने मद्यपी वाहन चालकांविरोधात मोहिम हाती घेत, कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली. मात्र ही मोहीम या वर्षात तितक्याच तीव्रतेने अजूनही सुरूच आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे शहर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर या परिसरात मद्यपी चालकांविरोधात वाहतुक शाखेने साडेपाच हजार गुन्हे नोंदवले आहेत. तसेच त्यातील प्रत्येकाकडून दोन हजार रूपयांप्रमाणे दंड आकारला आहे. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात वाहतूक शाखेने तीन हजार ३०० मद्यपींना पकडले आहे. तसेच ३०१ ते ५०० मिली ग्रॅमपेक्षा अधिक म्हणजे ओव्हर रेंज झालेले मद्यपी कारवाईत सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली.>दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांत दुचाकीस्वार जास्तमद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यापाठोपाठ चार चाकी आणि तीन चाकी वाहनचालकांचा नंबर लागतो. या पकडलेल्या वाहन चालकांमध्ये २६ ते ३५ या वयोगटातील तरुणांचा सर्वाधिक आहे.त्याचबरोबर ३६ ते ५० तसेच १८ ते २५ अशी या वयोगटातील मद्यपींची संख्या त्यापाठोपाठ आहे. विशेष म्हणजे पकडण्यात आलेल्या चालकांमध्ये सर्वाधिक १०१ ते ३०० मिली ग्रॅमइतके अल्कोहलचे प्रमाण सापडले. त्यापाठोपाठ मद्यपींमध्ये १०० मिली ग्रॅमपर्यंत अल्कोहलचे प्रमाण आढळून आले.