शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक दृर्बल घटकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार?

By admin | Updated: July 12, 2016 22:07 IST

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.

ऑनलाइन लोकमतपिंपरी, दि. 12 - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. महापालिका, केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या विषयीचे सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरकुल योजना आखली असून ,त्या दृष्टीने गृहप्रकल्पाची योजना पिंपरी-चिंचवड शहरातही राबविण्यात येणार आहे. शहरी गरिबांच्या घराचे स्वप्न या योजनेतून पूर्ण केले जाणार आहे. या संदर्भात आज बैठक झाली. या वेळी आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृहनेत्या मंगला कदम, स्थायी समिती अध्यक्ष डब्बू आसवानी आदींसह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. याविषयी आयुक्तांसमोर सादरीकरण करण्यात आले. चिखली येथे शहरी गरिबांसाठी घरकुल योजना महापालिकेच्या वतीने राबविण्यात आली. त्यानंतर नवीन योजना राबविण्याबाबत महापालिका विचार करीत आहे.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल योजना, लाभार्थींचे निकष, त्या संदर्भातील डीपीआर आराखडा तयार करणे, केंद्र, राज्य आणि महापालिका, लाभार्थी यांचा सहभाग याबाबतच्या विषयावर चर्चा झाली. ही योजना पिंपरी-चिंचवडमध्ये राबविण्यासाठी आवश्यक असणारी जागा, त्याचे क्षेत्र यावरही चर्चा झाली. या योजनेसाठीच्या घरांसाठी केंद्र शासन दीड लाख, राज्य शासन एक लाख अनुदान देणार आहे, उवरित रक्कम ही महापालिका आणि लाभार्थ्याकडून घेण्यात येणार आहे. एसआरएच्या माध्यमातून याबाबतचे सर्वेक्षण सुरू झाले असून, हे काम जुलैअखेर पूर्ण होईल. त्यानंतर ही योजना राबविण्यासंदर्भातील आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यानंतर किती घरे उपलब्ध होतील, याबाबत माहिती देणे शक्य होईल, असे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.या विषयी लोकप्रतिनिधींनीही काही सूचना केल्या.आयुक्त वाघमारे म्हणाले, आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाची योजना आहे. ही योजना शहरात राबविण्याच्या दृष्टीने आज बैठक झाली. त्यातून सामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. याबाबतचे सर्वेक्षण, आराखडा, अनुदान यावर प्राथमिक चर्चा झाली. सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. त्यानंतर त्यासंदर्भातील डीपीआर तयार करून शासनाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर योजनेच्या कामास सुरुवात होईल. त्यानंतर घरकुलासाठी असणारी रक्कम, महापालिका आणि लाभार्थीचा शेअर याबाबतचे धोरण ठरविण्यात येईल.