शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वेल्हे तालुक्यात पर्यटनाचा विकास करणार : बापट

By admin | Updated: July 22, 2016 01:26 IST

आगामी काळात तालुक्यात पर्यटनाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून, जिल्हा नियोजनमधून विविध कामे केली जाणार आहेत

मार्गासनी : ‘‘आगामी काळात तालुक्यात पर्यटनाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून, जिल्हा नियोजनमधून विविध कामे केली जाणार आहेत,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.वेल्हे येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन वेल्हे येथील लक्ष्मीगंगा कार्यालयात करण्यात आले होते. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बापट बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, संघटनमंत्री रवी अनासपुरे, माजी आमदार शरद ढमाले, महिला जिल्हा नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, अध्यक्षा क्रांती सोमवंशी, तालुकाध्यक्ष आनंद देशमाने, वेल्हे तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मनोज जगताप, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड, शोभा पासलकर, अण्णा शिंदे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष नाना साबणे, रवींद्र दसवडकर, विश्वास दामगुडे, नीलेश कुलकर्णी, दिनेश मळेकर उपस्थित होते.या वेळी रिपाइंचे श्रीरंग भिंगारे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तर तालुकाध्यक्ष आनंद देशमाने यांनी तालुक्यातील वेल्हे-मढे घाटरस्ता, राजगड, तोरणा गडास पर्यटनाचा दर्जा, तसेच तालुक्यातील शिक्षण, आरोग्य, पाणी तसेच धरणग्रस्तांच्या विविध समस्या मांडल्या. या सर्व समस्या सोडावाव्यात, अशी मागणी गिरीश बापट यांच्याकडे केली. विठ्ठल पवार यांनी सूत्रसंचालन केले. (वा.प्र.)>वेल्हे तालुक्यात अनेक समस्या आहेत. या समस्या वर्षानुवर्षे तशाच आहेत. पण या समस्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोडविणे आपले काम आहे. यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कामाला लागून शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविल्या पाहिजेत. पंचायत समिती व जिल्हा परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपाचा कार्यकर्ता गेला पाहिजे. -गिरीश बापट, पालकमंत्री