शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘बालगृहे कधी सुधारणार?’

By admin | Updated: July 2, 2016 04:38 IST

उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने काही दिवसांपूर्वीच बालसुधारगृहांची स्थिती सुधारण्यासंदर्भात काही शिफारशी केल्या आहेत.

मुंबई : उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने काही दिवसांपूर्वीच बालसुधारगृहांची स्थिती सुधारण्यासंदर्भात काही शिफारशी केल्या आहेत. या शिफारशींची अंमलबजावणी केव्हा करणार? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.राज्यातील बालसुधारगृहांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याने त्यात सुधारणा करण्यासाठी उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली. न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.सुनावणीत न्यायालयीन मित्रांच्या समितीने काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडे मानखुर्द आणि उमरखाडी बालसुधारगृहांच्या स्थितीबद्दल अहवाल सादर केल्याची माहिती दिली. मानखुर्द बालसुधारगृहाच्या बाहेर संरक्षक भिंत उभारणे आवश्यक आहे. या इमारतींचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे, असे समितीने अहवालात म्हटले आहे. मानखुर्द बालसुधारगृह चालवणारी एनजीओ ‘चिल्ड्रन्स एड सोसायटी’कडे मुलांबद्दल काही माहिती मागविण्यात आली होती. मात्र एनजीओने ती माहिती पुरवली नाही, असेही समितीने अहवालात नमूद केले आहे. ‘मानखुर्द बालसुधारगृहाची व्यवस्था करण्यात ‘चिल्ड्रन्स एड सोसायटी’ची काय भूमिका आहे? आणि या एनजीओला काय अधिकार देण्यात आले आहेत? याची माहिती राज्य सरकारने द्यावी. तसेच समितीने केलेल्या शिफारशींची केव्हा अंमलबजावणी करणार, याचीही माहिती राज्य सरकारने द्यावी,’ असे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी २० जुलै रोजी ठेवली. (प्रतिनिधी)