शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सहा दिवसांत उडीद-मूग खरेदी करणार!

By admin | Updated: September 5, 2016 01:48 IST

खामगाव येथील सत्कार सभारंभात उडीद-मूग खरेदी करणार असल्याची घोषणा कृषिमंत्र्यांनी केली.

खामगाव (जि.बुलडाणा), दि. ४: शेतकर्‍यांकडे शेतमालाची आवक सुरू झाली, की शेतमालाचे भाव पडतात. मालाची शेतकर्‍यांकडून खरेदी आटोपताच लगेचच भाववाढ होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी येत्या सहा दिवसांमध्ये नाफेडकडून उडीद-मूग खरेदी केली जाणार असल्याची घोषणा कृषी व फलोत्पादन मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी येथे केली. ते येथे कृषिसेवा केंद्राच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की शेतकर्‍यांच्या शेतमालासाठी हमी भाव शासनाने ठरवून दिले आहेत. तथापि, मुगाची आवक सुरू होताच, बाजारात मुगाचे भाव पडले. हमीभावापेक्षाही कमी दराने मुगाची खरेदी केली जात असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे. हीच परिस्थिती उडीद आणि इतर शेतमालाची आवक होताच असते. त्यामुळे शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी येत्या सहा दिवसांमध्ये उडीद आणि मुगाची खरेदी नाफेड मार्फत केली जाईल. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन आपल्या स्तरावर उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी युरियाचे भाव कमी करण्यात आले आहेत. उत्पादन आधारित भाव देत नसाल तर, शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च कमी करण्याची शासनाची भूमिका असल्याचेही ते शेवटी म्हणाले.आपण 'मॅनेज' होणार्‍यांपैकी नाही!कृषिमंत्री पदाची धुरा घेताच, आपल्याकडे अनेक प्रस्ताव आले. कृषी क्षेत्रातील कडक धोरणामुळे काहींकडून दबावही आला. मात्र, शेतकर्‍याचा पुत्र असल्यामुळे आपण सर्व दबाव आणि प्रस्ताव झुगारून शेतकरी हिताचे काम करीत आहोत. ह्यमॅनेजह्ण होऊन पैसे आपल्याला कमवायचे नाहीत. विरोधी पक्ष नेता असतानाही, अनेक आमिष आपणाला आलीत. पण, आपण त्याला बळी पडलो नाहीत. देवाने पोटाला पुरेल एवढं दिले आहे.   'मॅनेज' होणार्‍यांपैकी आपण नाही, असे ते म्हणाले. वेगळ्या मार्गाने आणि अतिरिक्त पैसा कमविणार्‍यांचे काय हाल होताहेत, हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.