शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बदली झाली तरीही प्रामाणिकपणे काम करणार - तुकाराम मुंढे

By admin | Updated: October 26, 2016 12:20 IST

कितीही वेळा बदली झाली तरी प्रामाणिकपणे काम करत राहणार,'असे नवी मुंबई मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी मुंबई, दि 26 - बेधडक आणि लोकोपयोगी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधकांनी युती करत अखेर अविश्वास ठराव बहुमताने मंजूर केला. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा सध्या सुरू आहे. 'बदली होणार की नाही हे मला माहित नाही, पण कितीही वेळा बदली झाली तरी प्रामाणिकपणे काम करत राहणार,'अशी रोखठोक प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 
 
कायद्यानुसार काम करणे, लोकांच्या समस्यांवर काम करणे, शहर-नागरिकांना सुविधा पुरवणे, ही माझी जबाबदारी आहे, त्यामुळे माझी चूक असेल तर दाखवा, मी माझी कार्यपद्धती सुधारेन, असेही मुंढे म्हणाले आहेत. तसेच सन्मानाची वागणूक देत नाही, आकसबुद्धीने वागतो, हे माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  मात्र याच वेळी जनतेसाठी एक पाऊल मागे घेण्यासाठी काहीच अडचण नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. 
आणखी बातम्या
 
सध्या नवी मुंबईमध्ये फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांविरोधात मुंढे यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. यावरुनच त्यांना टार्गेट केले जात असल्याचे बोलले जात आहे. जे काही निर्णय घेतले आहेत ते सर्व नियमाला धरुन घेतले आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांची अविश्वास ठराव मांडताना युती कशी झाली हे माहिती नाही, आणि हा प्रश्न राजकीय असल्याचेही मुंढे
म्हणाले आहेत.