शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराचा गुन्हा रद्द होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 05:21 IST

कळवा घोलाईनगर येथील महिलेवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याची शिफारस न्यायालयाकडे केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली.

ठाणे : कळवा घोलाईनगर येथील महिलेवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याची शिफारस न्यायालयाकडे केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली. आपल्या १४ वर्षांच्या मुलीच्या सल्ल्याने या महिलेने बलात्काराचा बनाव केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले आहेत.रविवारी सायंकाळी झालेली ही कथित सामूहिक बलात्काराची घटना हा बनाव असल्याचे अवघ्या २४ तासांत पोलिसांनी उघड केले. या महिलेचे पती व्यंकटेश यांनी दीड वर्षापूर्वी कर्नाटकातील शिरसप्पाच्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकल्याचा आरोप आहे.याच प्रकरणात त्याला अटकही झाल्यामुुळे तो कारागृहात होता. शिरसप्पा व त्याचे साथीदार आपल्याला नव्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती व्यंकटेशने पत्नीकडे बोलून दाखवली होती. आपले वडील व आई यांचे संभाषण त्यांच्या मुलीने ऐकले होते. त्यामुळे तिने बलात्काराचा बनाव करण्याची युक्ती आईला सुचवली होती.वैद्यकीय तपासणीत बलात्काराचे पुरावे नाहीतबलात्काराचा आरोप करणाºया महिलेच्या वैद्यकीय तपासणीत या आरोपास दुजोरा मिळालेला नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे परिस्थितीजन्य पुराव्यांना वैद्यकीय अहवालाची जोड लाभली आहे.तिघांचे जबाब नोंदविणार...कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पवार यांचे एक पथक तेलंगणातील तीन कथित आरोपींचा जबाब नोंदवण्यासाठी गेले आहे. त्यांचा जबाब नोंदवल्यानंतर इतर सर्व बाजूंची पडताळणी करून बलात्काराचा गुन्हाच रद्द करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचेही एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.