पुणो : पंजाबमधील घुमान येथे होणा:या 88 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळामार्फत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार दि. 1क् डिसेंबर रोजी घुमान साहित्य संमेलनाध्यक्षांचे नाव घोषित केले जाणार आहे. लढत चौरंगी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
संत नामदेव यांची कर्मभूमी असलेल्या घुमान येथे दि. 3 ते 5 एप्रिल या कालावधीत संमेलन होणार आहे. या संमेलनासाठी अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. या वेळी कोषाध्यक्ष सुनील महाजन, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. प्रमोद आडकर उपस्थित होते.
डॉ. वैद्य म्हणाल्या, साहित्य महामंडळाच्या घटक संस्था, समाविष्ट संस्था, संलग्न आणि निमंत्नित संस्थांकडून महामंडळाकडे अंतिम मतदार याद्या आल्या आहेत. 23 सप्टेंबर ही अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. दि. 1क् डिसेंबरला मतमोजणी होऊन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मागील वर्षीप्रमाणो यंदाही मतपत्निका रजिस्टर पोस्टाने पाठवल्या जाणार आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी चार घटक संस्थांची प्रत्येकी 175, समाविष्ट संस्थांची 5क्, संलग्न संस्थांची 11, संमेलन पूर्वाध्यक्षांना प्रत्येक 1, कोशाचे विश्वस्त यांना प्रत्येकी 1, इच्छुक उमेदवारांना प्रत्येकी 1, निमंत्नित संस्थांना 85 अशी मते नोंदवली
जाणार आहेत. मागील वर्षी या निवडणुकीसाठी 1 हजार 69 मतदारांनी मतदान केले होते. यंदाही यामध्ये बदल झालेला नाही. (प्रतिनिधी)
घुमानला संमेलन घेण्यावरून प्रकाशकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी बोलताना डॉ. वैद्य म्हणाल्या, साहित्यक्षेत्न हा संमेलनाचा अविभाज्य घटक असल्याने संमेलनाच्या सोहळ्यात प्रकाशक, साहित्यिक, साहित्यप्रेमी या सर्वांनीच सहभागी व्हावे अशी अपेक्षा आहे. मात्र संमेलन घुमानला घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय बदलता येणार नाही. प्रतिसंमेलनाच्या मागणीचाही विचार होणार नाही. यातून संवादाने मार्ग काढता येऊ शकेल. त्यासाठी प्रकाशकांशी चर्चेस आम्ही तयार आहोत.
निवडणूक कार्यक्रम
413 सप्टेंबर (सायं. 6 वा.) : निवडणूक मतदार यादी जाहीर करणो.
423 सप्टेंबर (सायं. 7 वाजेर्पयत) : निवडणूक अधिका:यांकडे उमेदवारांची नावे येण्याची अंतिम मुदत.
423 सप्टेंबर (सायं. 7 नंतर) : निवडणूक अधिका:याने छाननी करून उमेदवारांची नावे जाहीर करणो.
43क् सप्टेंबर (सायं. 6 र्पयत) : उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत.
43क् सप्टेंबर (सायं. 7 वा.) : उमेदवारांची अंतिम यादी जाहीर.
49 ऑक्टोबर : मतदारांना मतपत्रिका टपालाने पाठविण्याची अंतिम मुदत.
49 डिसेंबर (सायं. 7 वाजेर्पयत) : मतदारांकडून मतपत्रिका निवडणूक अधिका:यांकडे परत पोहोचण्याची अंतिम मुदत.
41क् डिसेंबर : मतमोजणी व निकाल.
देखणो, सासणो, कामत, सबनीस शर्यतीत
दरम्यान, या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणो, डॉ.अशोक कामत, डॉ.श्रीपाल सबनीस, भारत सासने यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणुक चौरंगी होण्याची शक्यता आहे.