शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एसी लोकल आणखी लांबणार ?

By admin | Updated: July 4, 2016 05:07 IST

मुंबईत दाखल झालेल्या एसी (वातानुकूलित) लोकलचा प्रवास आणखी लांबण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुंबईत दाखल झालेल्या एसी (वातानुकूलित) लोकलचा प्रवास आणखी लांबण्याची शक्यता आहे. या लोकलच्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक समस्या अद्यापही सुटलेली नसून त्यामुळे चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) बनलेली ५४ कोटी रुपयांची एसी लोकल काही महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेकडे दाखल झाली. या लोकलची १६ मेपासून ट्रान्स हार्बर मार्गावर चाचणी घेतल्यानंतर ती त्वरित प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र चाचणी १६ मेपर्यंत न झाल्याने ती प्रवाशांच्याा सेवेतही दाखल होऊ शकली नाही. सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक समस्या असून, ती सोडविण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्या वेळी मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले होते. तोपर्यंत या लोकलच्या अन्य काही चाचण्या घेण्यावर मध्य रेल्वेकडून भर देण्यात आला; आणि चार सॉफ्टवेअर चाचण्या वगळता अन्य १२ चाचण्या कुर्ला कारशेडमध्ये घेण्यात आल्या. त्या चाचण्यांमध्ये ही लोकल पास झाली. मात्र जुलै सुरू झाला तरी सॉफ्टवेअरमधील तांत्रिक समस्या काही सुटलेली नाही आणि त्याविषयीच्या चाचण्या घेणे बाकी आहे. या लोकलचे दरवाजे उघड-बंद होण्यासंदर्भातील सॉफ्टवेअरचा प्रश्न सुटलेला नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी काही परदेशी तंत्रज्ञ आणि मध्य रेल्वेचे तंत्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. जुलै महिन्यात होणाऱ्या चाचण्यांवरही प्रश्न निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ही लोकल आॅक्टोबरपर्यंत दाखल करण्याचा विचार मध्य रेल्वेकडून केला जात आहे. (प्रतिनिधी)>मध्य रेल्वेच्या नियोजनानुसार, पहिल्या १६ चाचण्या घेतल्यानंतर १ ते १५ जुलैपर्यंत पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या १६ चाचण्या आरडीएसओकडून (रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन) करण्याचे नियोजन करण्यात आले होते. कारशेडमधून बाहेर पडल्यानंतर २१ मुख्य चाचण्या या ठाणे ते कर्जत पट्ट्यात किंवा ट्रान्स हार्बर मार्गावर घेण्याचा विचार आहे. परंतु त्याचे वेळापत्रकच बिघडले आहे.