शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती

By admin | Updated: March 3, 2017 01:21 IST

बोरीबेल (ता. दौंड) परिसरातील वनखात्याच्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे वन्य प्राणी आहेत.

देऊळगावराजे : बोरीबेल (ता. दौंड) परिसरातील वनखात्याच्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे वन्य प्राणी आहेत. एकंदरीत वाढत्या उष्णतेमुळे या जंगलातील पाणवठ्यातील पाण्याने तळ गाठल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात या वन्यप्राण्यांना लोकवस्तीकडे यावे लागते. रस्ता ओलांडताना या वन्य प्राण्यांना अपघातास सामोरे जावे लागते. परिणामी वन्य प्राण्यांना मृत्युमुखी पडावे लागते. तेव्हा वन खात्याच्यावतीने या परिसरातील पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे.या परिसरातील जंगलात मोर, लांडोर, चिमण्या, कावळे, पाखरं, कोल्हा, कुत्रे, हरिण, जंगली ससे यांसारखी वन्यप्राणी राहत आहेत. बोरीबेलच्या परिसरात डोंगर भाग जास्त असल्याने या परिसरात उष्णतेचे प्रमाण नेहमीच जास्त असते .या भागापासून भीमा नदीचे अंतर जास्त असल्याने शेतकऱ्यांना पाईपलाईनद्वारे पाणी आणणे शक्य नाही. त्यामुळे या भागात पाण्याची समस्या नेहमीच सतावत असते. गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा यंदा लवकरच कडक उन्हाळा जाणवू लागला आहे.(वार्ताहर) >पालापाचोळा,धूळ ...वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी बोरीबेल येथील जंगलामध्ये पाणवठे तयार करण्यात आले आहेत; परंतु ते पाणवठे अद्याप पाण्याने भरले नाहीत. येथील काही पाणवठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पालापाचोळा, धूळ, मातीचा गाळ पडल्याने ते खराब झाले आहे.परिणामी, यामध्ये पाणीसाठवण क्षमता कमी झाल्याने वनविभागाच्या वतीने या पाणवठ्यातील पालापाचोळा व मातीचा गाळ काढावा. >सेवाभावी संस्थांना मदतीचे आव्हानमार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची तीव्र टंचाई भासू लागल्याने बोरीबेल परिसरातील डोंगराळ भागातील वन्य प्राण्यांची पाण्याअभावी भटकंती सुरू झाली आहे. तेव्हा तालुक्यातील सेवाभावी संस्था तसेच दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन या वन्यप्राण्यांच्या पिण्यासाठी टँकर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पुढे येत आहे.बोरीबेल परिसरातील वन्यप्राण्यांसाठी बांधण्यात आलेल्या पाणवठ्यांतील पालापाचोळा, गाळ काढण्यात येणार आहे. तसेच वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने करण्यात येणार आहे.- किशोर येळे, वन अधिकारी