शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

उंचीसाठी ‘विग’ लावला!

By admin | Updated: March 26, 2017 02:40 IST

परीक्षेत पास होण्यासाठी कॉपीबहाद्दरांकडून विविध शक्कल लढविली जाते, मात्र कायदा व सुव्यवस्था राखणारे व

नाशिक : परीक्षेत पास होण्यासाठी कॉपीबहाद्दरांकडून विविध शक्कल लढविली जाते, मात्र कायदा व सुव्यवस्था राखणारे व गुन्हेगारांना जरब बसविणाऱ्या पोलिसांना शनिवारी चक्क भरतीसाठी आलेल्या उमेदवाराने ‘मामू’ बनविण्याचा प्रयत्न केला़ या तरुणाने दोन सेंटीमीटर उंची वाढविण्यासाठी चक्क डोक्यावर नकली केसांचा टोप अर्थात विग लावला होता़ त्याची ही बनवेगिरी चाणाक्ष पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली व युवकास कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागले़ शनिवारी त्र्यंबकेश्वरहून राहुल किसन पाटील भरतीसाठी आला होता. भरतीसाठी आवश्यक १६५ सेमी उंचीसाठी त्याने चक्क केसाचा टोप परिधान केला होता. एका चाणाक्ष पोलीस कर्मचाऱ्यास त्याच्या केसांबाबत संशय आला व त्याने ही बाब पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या निदर्शनास आणून दिली़ त्यांनी तत्काळ त्यास जवळ बोलावून तपासणी केली असता त्याने डोक्यावर विग लावल्याचे उघडकीस आले.पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी पोलीस खात्याची फसवणूक करणाऱ्या या युवकास भरतीप्रक्रियेत अपात्र ठरविले असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत़ राहुलवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)पोलीस भरतीसाठी आलेल्या युवकाची उंची योग्य भरल्याने प्रथम त्यास पात्र ठरविण्यात आले होते़ मात्र त्याचा खोटारडेपणा उघड झाल्यानंतर अपात्र ठरविण्यात आले. उमेदवारांनी कोणत्याही चुकीच्या गोष्टींचा वापर करु नये, त्यासाठी आयुष्यभरासाठी नोकरीची संधी गमवावी लागेल़- श्रीकांत धिवरे, पोलीस उपायुक्त, नाशिक शहर.