शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून

By admin | Updated: April 12, 2017 22:55 IST

चारित्र्याच्या संशयातून शिवीगाळ करीत पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केला.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 12 : चारित्र्याच्या संशयातून शिवीगाळ करीत पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केला. सुरूवातीला जिन्याच्या पायरीवरून खाली पडल्याचा बनाव रचत दिशाभूल करण्याचा त्याने प्रयत्न केला मात्र तपासामध्ये स्वत: च खून केल्याची कबुली पतीने दिल्याने खूनाचा हा प्रकार उघडकीस आला. घोरपडी भागातील बी. टी. कवडे रस्त्यावरील सोसायटीमध्ये ही घटना घडली. तातोबा पांडुरंग गरदाडे ( वय ३३, रा. ओम सोसायटी, वळवीनगर, बी. टी. कवडे, घोरपडी) याला अटक करण्यात आली आहे. मनीषा तातोबा गरजादे (वय ३०, रा. बी. टी. कवडे, घोरपडी) असे मृत महिलेचे नाव आहे. सुनिता बेरगळ ( वय ३५, बी. टी. कवडे रोड, घोरपडी) यांनी फिर्याद दिली आहे. मनीषा गरजादे इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या पायरीवरून खाली पडून बेशुद्ध झाल्याने त्यांना नोबेल हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यानच त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आले. त्यांना ससून रूग्णालयात नेले असता गळ्यावर उठलेल्या वणामुळे हा प्रकार खुनाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यादृष्टीने तपासाची सूत्रे फिरली असता पतीनेच खून केल्याची कबुली दिली. मुले घराखाली खेळत होती, त्याचा फायदा घेत पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे आरोपीने सांगितले. तातोबा पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन वेळोवेळी शिवीगाळ आणि मारहाण करीत होता. तातोबा हा भारत फोर्ज मध्ये हेल्पर म्हणून बिगारी कामगार होता आणि त्याची पत्नीही मजूर म्हणून काम करीत होती. मुंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगताप आणि पीएसआय पाटील यांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला.