शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या

By admin | Updated: August 17, 2015 00:52 IST

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची कुऱ्हाडीने खांडोळी केल्याची खळबळजनक घटना वर्धेत शनिवारी सायंकाळी उघड झाली. तिचे शीर, हात व पाय कापून एका प्लास्टिकच्या

वर्धा : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची कुऱ्हाडीने खांडोळी केल्याची खळबळजनक घटना वर्धेत शनिवारी सायंकाळी उघड झाली. तिचे शीर, हात व पाय कापून एका प्लास्टिकच्या पोत्यात बाधून फेकले. कुत्र्यांनी या पोत्यातील मानवी अवयव बाहेर काढल्याने या हत्येला वाचा फुटली. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली असून त्याने हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगला मोहन वरठी (३८) असे मृत महिलेचे नाव आहे. अंजनामाता परिसरात काही कुत्र्यांनी मानवी अवयव उचलून आणल्याचे येथील नागरिकांच्या नजरेत पडले. त्याची पाहणी केली असता तो मानवी पाय होता. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. यावरून सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पोलिसांचा शोध सुरू असताना काही अंतरावर आलोडी शिवारात महिलेचा पाय, हात व शीर आढळून आले. शीर प्लास्टिकच्या पिशवीत असल्याचे दिसून आले.ही महिला कुठली याचा शोध सुरू असताना इंदिरानगर येथील मंगला वरठी नामक महिला शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याची माहिती तिच्या घरच्यांना देण्यात आली. यावरून तिचा मुलगा घटनास्थळी पोहोचला. महिलेच्या इतर शरीराचा शोध सुरू असताना कारला मार्गावर एका पोत्यात बांधून असलेला तिचे धड आढळले. मंगलाच्या नातलगांनी तिची हत्या पती मोहन यानेच केल्याची तक्रार दाखल केली. यात त्यांनीही अनैतिक संबंधाचा उल्लेख केला होता. यावरून सेवाग्राम पोलीस ठाण्यात या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तिच्या शरीराच्या काही अवयवाचा तपास पोलीस रविवारीही घेत होते. मोहन याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा असताना रविवारी सायंकाळी त्याने हत्येची कबुली दिली. त्याने शुक्रवारी रात्री मंगलाची हत्या केल्याचे सांगितले.मोहन नेहमी बाहेर राहत असल्याने पत्नीचे कोणासोबत तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला आला. या कारणावरून या दोघांत वाद होत होता. त्यातूनच शुक्रवारी रात्री तिची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)