शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

लग्नासाठी भाग पाडल्याने पत्नीची हत्या

By admin | Updated: May 14, 2017 02:02 IST

लग्नाचा तगादा लावल्याने, पे्रयसी सोबत लग्न करून पाचव्याच दिवशी हत्या केल्याचा व मृतदेहाचे तुकडे करून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लग्नाचा तगादा लावल्याने, पे्रयसी सोबत लग्न करून पाचव्याच दिवशी हत्या केल्याचा व मृतदेहाचे तुकडे करून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रबाळे एमआयडीसी येथे नाल्यामध्ये आढळून आलेला मृतदेह प्रियंका गुरव (२३) हिचा असल्याचे स्पष्ट झाले होते. प्रियंकाच्या मानेवरील गणपतीच्या टॅटूवरून भाऊ गणेश भामरे याने तिचा मृतदेह ओळखला होता. या वेळी त्याने तिच्या हत्येमागे सासरच्यांचा समावेश असल्याचीही शक्यता वर्तवली होती. यादरम्यान प्रियंकाच्या पती व सासू-सासऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्रियंकाचे सिद्धेश गुरव (२४) याच्यासोबत प्रेमसंबंध होते; परंतु तो लग्नाला नकार देत असतानाही प्रियंकाने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. या वेळी प्रियंकाच्या घरच्यांनीही सिद्धेश सोबत लग्न करू नको, असा सल्ला दिला होता. सिद्धेश व त्याची आई माधुरी गुरव (४५) व वडील मनोहर गुरव (४९) यांनाही ती सून म्हणून मान्य नव्हती. सिद्धेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्यासाठी अधिक चांगली पत्नी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा होती. फक्त प्रियंकाने पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार करेन, अशी धमकी दिल्यामुळे त्यांनी लग्नाला होकार दिला होता. मात्र, लग्न केल्यानंतर तिचा कायमचा काटा काढायचा, असा कटही त्यांनी या वेळी रचला. त्याकरिता लग्न अगदी साध्या पद्धतीने त्यांनी उरकले होते. लग्नाच्या पाचव्या दिवशीच तिची हत्या केली. वरळी येथील सासरच्या घरामध्ये तोंड दाबून प्रियंकाची हत्या केल्यानंतर दुर्गेश पटवा याच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. त्यानंतर धड रबाळे एमआयडीसी हद्दीत, तर शिर व पाय इतर ठिकाणी टाकल्यानंतर, नोकरीच्या शोधात गेलेली प्रियंका बेपत्ता झाल्याचा बनाव त्यांनी रचला होता. याकरिता त्यांनी दुर्गेशला एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. यानुसार प्रियंकाच्या हत्येप्रकरणी पती सिद्धेश गुरव, वडील मनोहर, आई माधुरी व साथीदार दुर्गेश पटवा यांना अटक करण्यात आली आहे.