शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

रखवालदाराकडून गळा आवळून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 17:41 IST

कौटुंबिक वादातून रखवालदाराने पत्नीचा गळा आवळून खून केला. ही घटना गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास स्पाईन रोड, चिखली येथे उघडकीस आली. कमला रामू

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 02 - कौटुंबिक वादातून रखवालदाराने पत्नीचा गळा आवळून खून केला. ही घटना गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास स्पाईन रोड, चिखली येथे उघडकीस आली. कमला रामू विश्वकर्मा (वय २२, रा. चिखली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी रामू विश्वकर्मा (वय २३ ) या आरोपीला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वकर्मा कुटुंबिय मूळचे नेपाळचे आहेत. चिखली येथील धीरज अपार्टमेंटमध्ये तो रखवालदार म्हणून नोकरी करत होता. सोसायटीच्या बाजूलाच असलेल्या छोट्या खोलीत हे नेपाळी दांपत्य राहात होते. गुरुवारी सकाळी पती-पत्नीत भांडण झाले. भांडणात राग अनावर झालेल्या रामूने कमलाचा गळा आवळून खून केला. हा आत्महत्येचा प्रकार असावा, अशी सुरूवातीला चर्चा होती. मात्र नंतर पती रामुनेच कमलाचा खून केल्याचे प्राथमिक तपासात  पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांना दोन मुले आहेत. पत्नीचा  खून करुन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या रामुला पोलिसांनी शिताफिने पकडले. कमलाचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी  महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 
परप्रांतियांच्या माहितीचा अभाव ..
परप्रांतिय व्यकतींना सोसायट्यांमध्ये घरे भाड्याने देताना,कामावर नेमणूक करताना,त्यांची माहिती घेणे आवश्यक आहे. मात्र अनेक सोसायट्या अशी माहिती घेण्याबाबत उदासिनता दाखवतात. बहुतांशी ठिकाणी सोसायट्यांमध्ये नेपाळी लोक रखवालदार म्हणुन नेमलेले आहेत. त्यांना मराठी,हिंदी भाषा येत नाही.लिहिता, वाचता येत नाही, तरिही कमी मोबदल्यात उपलब्ध होत असल्याने  सोसायट्यांमध्ये त्यांना प्राधान्याने रखवालदारीचे काम दिले जाते. रखवालदार म्हणुन नेमणूक केल्या जाणा-या व्यकतीची पार्श्वभूमी तसेच अन्य माहिती सोसायटीकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे. हा मुद्दा या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.