शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला वाचवण्यासाठी केली पत्नीची हत्या

By admin | Updated: May 13, 2017 01:16 IST

पत्नीची हत्या करून पळालेल्या पतीला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीने लहान मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याने त्याने

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पत्नीची हत्या करून पळालेल्या पतीला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीने लहान मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याने त्याने पत्नीची हत्या करून पळ काढल्याची कबुली दिली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होते.जयेश शशिकांत महालिम असे पतीचे नाव आहे. तो गोठीवली येथे पत्नी व दोन लहान मुलांसह काही वर्षांपासून रहायला होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी वैशाली घरातून पळून गेली होती. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार देखील दाखल होती. यादरम्यान वैशालीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली होती. यावरून अनेकदा त्यांच्यात वाद व्हायचे. घटनेच्या काही दिवसांपूर्वी देखील ती घरातून निघून गेली असता, शोध घेवून परत घरी आणण्यात आले होते. यावेळी जयेश याने दीड वर्षाच्या लहान मुलासाठी तरी सोबत राहा, तो मोठा झाल्यानंतर घटस्फोट देवून वेगळे होवू असे सांगितले होते. परंतु वैशालीने आताच वेगळे व्हायचे असल्याचे सांगत, रागाच्या भरात लहान मुलाच्या गळ्यावर कोयता लावुन त्याला मारण्याची धमकी दिली. यावेळी लहान मुलावर आलेले संकट न पाहावल्याने जयेश याने तिच्या हातातून कोयता हिसकावून घेवून, त्याच कोत्याने तिचा गळा कापला. यानंतर त्याने दोन्ही मुलांना स्वत:च्या आई-वडिलांकडे सोडून पळ काढला होता. शिवाय सकाळी शेजारच्या व्यक्तीला फोन करून पत्नीची हत्या केल्याचे व मृतदेह घरात असल्याचे सांगितले होते. यावरून रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या शोधासाठी सहायक निरीक्षक संतोष कोतवाल यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांच्याकडून जयेशचा शोध सुरू असतानाच तो पेण येथील रामवाडी गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कोतवाल यांच्या पथकाने गुरुवारी त्याठिकाणी छापा टाकून जयेशला अटक केली. अटकेनंतर त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली देत, पत्नीने मुलाचे प्राण घेण्याचा प्रयत्न केल्याने तिची हत्या केल्याचे सांगितले.