शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चारीत्र्याच्या संशयावरून पतीनेच गळा आवळून केला पत्नीचा खून

By admin | Updated: March 12, 2017 22:33 IST

लहवितची विवाहिता : शवविच्छेदन अहवालात उघड; पतीस अटक

नाशिक : लहवित येथील विवाहिता योगीता नवनाथ काळे हिने गळफास घेऊन आत्महत्त्या केली नसून, तिच्या पतीनेच गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे़ पोलिसांनी याप्रकरणी पती नवनाथ काळे यास अटक केली असून, चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे़ याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी रविवारी (दि़१२) त्यास अटक केली़लहवित येथील योगीता नवनाथ काळे या विवाहितेने गुरुवारी (दि़९) राहत्या घरी आत्महत्त्या केल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती़ मात्र, घटनास्थळी पोलीस पथक पोहोचले तेव्हा योगीताचा मृतदेह तिचा पती नवनाथ याने खाली उतरविलेला होता़ पोलिसांना याचवेळी पतीवर संशय होता. त्यांनी शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात मृतदेह दाखल केला़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या शवविच्छेदनात तिचा मृत्यू गळफास घेतल्याने नव्हे तर गळा आवळल्यामुळे झाल्याचे आढळून आले़वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी संशयित नवनाथ काळे यास रविवारी ताब्यात घेऊन चौकशी केली़ मात्र, प्रथम तो माहिती देण्यास टाळाटाळ करीत होता, त्यास पोलिसी खाक्या दाखविताच चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून खून केल्याची कबुली दिली़ तसेच पत्नी योगीताने आत्महत्त्या केली, असे वाटावे यासाठी बनाव केल्याचे सांगितले़ याप्रकरणी मयत योगीताच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार देवळाली कॅम्प पोलिसांनी नवनाथ काळे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे़ (प्रतिनिधी)