शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध देऊन पत्नीने केला खून; घरातच पुरले पतीचे प्रेत

By admin | Updated: June 4, 2016 03:19 IST

पतीला जेवणातून गुंगीचे औषध दिले व त्याची शुद्ध हरपल्यानंतर एका महिलेने त्याचा खून केला आणि मग दुसऱ्या घरात नेऊन प्रेत नेऊन पुरले. चिकलठाणा शिवारातील नवपुते वस्तीनजीक घडलेला

औरंगाबाद : पतीला जेवणातून गुंगीचे औषध दिले व त्याची शुद्ध हरपल्यानंतर एका महिलेने त्याचा खून केला आणि मग दुसऱ्या घरात नेऊन प्रेत नेऊन पुरले. चिकलठाणा शिवारातील नवपुते वस्तीनजीक घडलेला धक्कादायक प्रकार दहा दिवसांनंतर शुक्रवारी उघडकीस आला. विलास दादाराव आव्हाड (४०), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी संगीता (३६) ही पसार झाली आहे. मोलमजुरी करणारा विलास हा राजनगरात संगीता, मुलगा किशोर, सून सुरेखा, अन्य एक मुलगा व मुलीसोबत राहत होता. या घटनेनंतर किशोर गायब झाला आहे.विलास हा गेल्या दहा दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. चार दिवसांपूर्वी संगीता ही भारतनगरात सासू शांताबाई हिच्याकडे आली आणि ‘तुमचा मुलगा मोटारसायकल घेऊन घरातून गेला. चार- पाच दिवस उलटले तरी परत आलेला नाही. चला, आपण त्याचा शोध घेऊ’, असे सांगत ती सासूसोबत अनेक ठिकाणी फिरली. विलासच्या शोधार्थ जंग जंग पछाडत असतानाच गुरुवारी रात्री विलासची सून सुरेखाने फोन करून शांताबाई यांना आपल्या माहेरी सिंदखेडराजाला बोलावले. दुसऱ्या दिवशी सकाळी या तिघींची भेट झाली. तेव्हा सुरेखाच्या आईने विलास याचा खून झाल्याची माहिती शांताबाईना दिली. संगीतानेच विलासचा खून करून प्रेत चिकलठाणा शिवारातील दुसऱ्या घरात पुरल्याचे सुरेखाने सांगितले. हात दिसल्यानेसुनेला समजला प्रकार!विलासचा खून केल्यानंतर संगीता घरी आली. तिने किशोर आणि सुरेखाला ‘चला, आपल्याला नव्या घरात मुरूम पसरायचा आहे, असे सांगत दोघांना घेऊन ती ‘त्या’ शेडवर आली. तिघांनी मुरूम पसरविण्यास सुरुवात केली. ढिगारात पुरलेल्या विलासचा हात सून सुरेखाच्या नजरेस पडला. सासूने सासऱ्याचा खून केला आणि प्रेत तेथे पुरले, हे सुरेखाला उमगले. सुरेखाने माहेर गाठले आणि आपल्या आईला प्रकार सांगितला.कारण गुलदस्त्याततीन दिवसांपासून संगीता आणि किशोर बेपत्ता आहेत. ते सापडल्यानंतरच खुनाचे कारण समोर येईल, असे निरीक्षक जाधव यांनी सांगितले. विशेष म्हणजे ज्याठिकाणी हे प्रेत पुरण्यात आले होते, ती जागा संगीताने गुपचूप खरेदी केली होती. घरात याबाबत कुणालाही माहिती नव्हती.जेवणातून दिले गुंगीचे औषधच्आतापर्यंतच्या प्राथमिक तपासानुसार पती विलासला संपविण्याचा संगीताने निश्चय केल्यानंतर ‘त्या’ रात्री स्वयंपाक करताना भाजीतच संगीताने गुंगीचे औषध टाकले.च्विलासला गुंगी आल्यानंतर तिने जवळच राहणारा रिक्षाचालक महेशला बोलावले आणि ‘आम्हाला चिकलठाण्यात नणंदेच्या घरी सोड, शंभर रुपये देते’ असे सांगितले. त्यानुसार आपण मित्र गोविंदला सोबत घेतले आणि मग संगीता व तिचा पती विलासला चिकलठाणा शिवारातील वस्तीवर रात्री नेऊन सोडल्याचे रिक्षाचालक महेशने पोलिसांना सांगितले. च्संगीताने पत्र्याचे शेड असलेल्या घरात नेऊन पती विलासच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला आणि नंतर तेथे खड्डे खोदून प्रेत मुरुमात पुरले, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.