शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मूल होत नसल्याने केली पत्नीची हत्या

By admin | Updated: June 30, 2016 02:03 IST

लग्नाला सहा वर्षे उलटूनही मूल होत नव्हते म्हणून पत्नीची हत्या करत पतीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना पवईत घडली.

मुंबई : लग्नाला सहा वर्षे उलटूनही मूल होत नव्हते म्हणून पत्नीची हत्या करत पतीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना पवईत घडली. सुरेश बीजे (४०) आणि प्रीती सुरेश बीजे (३५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. या प्रकरणी सुरेशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.पवई येथील साई बागुरडा गावात बीजे दाम्पत्य राहायचे. त्यांचा प्रेमविवाह आहे. लग्नाला सहा वर्षे उलटूनही मूल होत नसल्याने दोघांमध्ये खटके उडायचे. प्रीतीवर उपचारही सुरू होते. गेल्या वर्षभरापासून सुरेशलाही डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्याने नोकरी सोडली. त्यानंतर तो घरीच राहायला लागला. तो मारझोड करत असल्याचे प्रीतीने बहीण मीनाला अनेकदा सांगितले होते. मंगळवारी दुपारी प्रीती घरी आली. रात्री आठच्या सुमारास भाजी नेण्यासाठी आलेल्या चुलत बहिणीने दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्याने तिने नातेवाइकांना याबाबत माहिती दिली. नातेवाइकांनी तेथे धाव घेत दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. खिडकीतून पाहिले असता सुरेशने गळफास घेतल्याचे आढळले. छप्पर तोडून सुरेशच्या भावाने घरात प्रवेश केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली प्रीती आणि गळफास घेतलेला सुरेश आढळला. (प्रतिनिधी)पत्नीवर हातोड्याचे वारपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूल न होण्यावरून मंगळवारी दोघांमध्ये भांडण झाल्याचा संशय आहे. याच रागात सुरेशने हातोड्याने पत्नीच्या डोक्यावर घाव घातले. त्यानंतर तिच्या हाताची नस कापली. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. प्रीतीच्या डोक्यावर हातोड्याने पाच घाव घालण्यात आले. या प्रकरणी सुरेशविरोधात हत्या करून आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सुसाइड नोट पोलिसांना सापडली नाही. मात्र तेथील एका वीज बिलावर झगडा असे लिहिले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुरेशने हे लिहिले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हे हस्ताक्षर नेमके कुणाचे याचा तपास सुरू असल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली.