शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने पतीकडेच मागितली खंडणी

By admin | Updated: August 23, 2016 03:33 IST

मीरा रोडच्या एका खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेस सोमवारी सायंकाळी काशिमीरा पोलिसांनी मीरा रोड रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले.

मीरा रोड : स्वत:चे अपहरण झाल्याचा बनाव करून पतीकडे १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या मीरा रोडच्या एका खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेस सोमवारी सायंकाळी काशिमीरा पोलिसांनी मीरा रोड रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. प्रियंका शुक्ला (२९, रा. विजय पार्क, मीरा रोड) असे या शिक्षिकेचे नाव आहे. ती राहत असलेल्या परिसरातच स्वत: खाजगी क्लास चालवते. तर, तिचा पती विलेपार्ले येथील खाजगी क्लासमध्ये शिकवतो. रविवारी दुपारी दीड वाजला तरी प्रियंका घरी परतली नव्हती. मात्र, तितक्याच तिच्या मोबाइलवरून तिचे अपहरण केल्याचा मेसेज पतीच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आला. तसेच तिचे तोंड व हात आदी बांधलेले असल्याचे फोटोही पाठवले. पत्नी जिवंत हवी असल्यास १० लाखांची खंडणी मागितली. त्यामुळे तिचा पती धास्तावला. त्याने थेट काशिमीरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिचा शोध सुरू केला. काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सानप, स्थानिक गुन्हे शाखेचे अभय कुरुंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची ६ पथके प्रियंका व कथित अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी रवाना केली. दरम्यान, खंडणी मागणारा आरोपी म्हणून ती पतीशी सतत मोबाइलद्वारे संपर्कात होती. पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून तिचा पाठलाग केला. मीरा रोड, दादर, कल्याण, इगतपुरी, भुसावळ, मनमाड असे विविध लोकेशन सापडले. त्यानुसार पोलीस तिचा शोध घेत होते.अखेर, सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ती मीरा रोड रेल्वे स्थानकात पैशांसाठी थांबली. लोकल पकडून जाण्याचा तयारीत असतानाच पोलीस पथकाने तिला शिताफीने पकडले. तिचे लोकेशन तसेच काही स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिचे अपहरण झाल्याची गोष्ट पोलिसांना खटकत होती. सोमवारी सायंकाळी ती हाती लागताच तिने स्वत:च्या अपहरणाचा बनाव करून पतीकडे १० लाखांची खंडणी मागितल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)>यापूर्वी उकळले ८० हजार : प्रियंकाने यापूर्वीदेखील पतीला चिठ्ठी पाठवत त्याच्याकडून ८० हजार रुपये उकळले होते. प्रियंकाला आम्ही ताब्यात घेतले आहे. तिची चौकशी सुरू आहे, असे काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सानप यांनी ‘लोकमत’ला सांगितले.