शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कंडक्टरचा घडविला पत्नीने खून

By admin | Updated: February 27, 2017 03:19 IST

दोरीने गळा आवळून पतीचा खून करण्याची सुपारी देणाऱ्या पत्नी सह तीन आरोपी मनोर पोलिसांनी गजाड केले

मनोर : दोरीने गळा आवळून पतीचा खून करण्याची सुपारी देणाऱ्या पत्नी सह तीन आरोपी मनोर पोलिसांनी गजाड केले असून त्यांना १ मार्च पर्यंत कोठडी देण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिक्षक निमित्त गोयल यांनी दिलेल्या माहिती नुसार मुंबई अहमदाबाद महामार्ग हलोली पाडोसपाडा येथे सापडलेल्या मृतदेहाची झडती घेतली असता त्याच्या खिशात कोरे तिकिटाचे कोरे पेपर्स त्याच्यावर एस टी चा लोगो व रा प ठाणे -२ आगार असे प्रिंट असलेल्या एका बाजूस एका इसमाचे नाव व दुसऱ्या बाजूस अन्य एका इसमाचे नाव चावीचा गुच्छा व मोबाईल नंबर मिळाले त्यावरून मृतदेहाची ओळख पटली. त्यांचे नाव पांडुरंग दत्तात्रय फड वय ३० असून ते ओवळा ठाणे येथील राहाणारे होते. त्यांच्या घरी पत्नी गजश्री पांडुरंग फड हिला विचारणा केली असता तिने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांना तिचा संशय आल्याने त्यांनी तिला पोलिसीखाक्या दाखविताच तिने कबुल केले की हा खून मी सुपारी देऊन घडवून आणला. लग्न झाल्यापासून तो दारू पिऊन माझा छळ करायचा, मला शिवीगाळ मारहाण करायचा मला मूल होत नसल्याने तो म्हणायचा तुझ्या लहान बहिणीशी माझे लग्न लाऊन दे त्यामुळे मी माझ्या गावातील शिवाजी वैजनाथ गायकवाड याला १ लाख रुपयांची सुपारी माझ्या नवऱ्याचा खून करण्यासाठी दिली होती.शिवाजी वैजनाथ गायकवाड याने त्याच्या ट्रकवर असलेला क्लीनर यास ही कामगिरी सांगून त्या बदल्यात दहा हजार रुपये कबूल केले. फडला मारण्यासाठी त्यांनी त्याच्या पत्नीच्या माध्यमातून दि. २० रोजी घोडबंदर येथे बोलावून ट्रकमध्ये बसवले त्यानंतर फडला भरपूर दारू पाजली. नशेत असतांना ट्रकमधील नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळून खून केला व हलोली पाडोस पाडा येथे त्याचा मृतदेह फेकून दिला अशी कबुली दोघांनी दिली. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)