शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

ग्रामीण जनतेवर भार कशाला?

By admin | Updated: March 19, 2015 01:06 IST

केंद्रात व राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन केंद्र सरकारने गुड्स अँड सर्व्हीसेस टॅक्स (जीएसटी) लागू करण्याची भूमिका जाहीर केली होती.

केंद्रात व राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन केंद्र सरकारने गुड्स अँड सर्व्हीसेस टॅक्स (जीएसटी) लागू करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्याला भाजपा व भाजपाशासीत राज्यांनी विरोध केला होता. आता केंद्र सरकारमध्ये बसल्यावर जीएसटी लागू करण्याची तयारी भाजपाने दाखवली. तसेच व्यापारी वर्गाचा प्रखर विरोध असलेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) १ आॅगस्ट २०१५ पासून रद्द करून त्याबदल्यात मूल्यवर्धीत कर (व्हॅट) लागू करण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मात्र त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेवर शहरातील लोकांच्या कराचा भार पडणार असून त्याला राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र विरोध करील.एलबीटी रद्द करण्याची व्यापाऱ्यांची मागणी मान्य केली पाहिजे. त्याला आपला विरोध नाही. मात्र मूठभर व्यापारी वर्गाचे उखळ पांढरे करताना ग्रामीण जनतेवरील व्हॅटचा बोजा वाढवणे सहन केले जाणार नाही. शहरी भागातून जमा होणारा कर ग्रामीण भागातील जनतेच्या गरजा भागवण्याकरिता वापरण्याची पद्धत आहे. मात्र एलबीटीला व्हॅटचा पर्याय देणे हे गंगा उलटी वाहण्याचा प्रकार आहे.अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात कर विषयक प्रस्तावांच्या भाग दोनमध्ये चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) व विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर)च्या प्रिमीयमचे दर वाढवून अतिरिक्त उत्पन्न मिळणार मिळणार असल्याचा दावा केला आहे. ही घोषणा हा करविषयक प्रस्तावाचा भाग कसा होऊ शकतो हा प्रश्नच आहे. एफएसआय व टीडीआर यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा शहरांत बांधकामे होणार हे स्पष्ट आहे. मुंबईसह वेगवेगळ््या शहरातील महापालिकांच्या क्षेत्रात सध्या नागरी सुविधांची स्थिती शोचनीय आहे. त्यामुळे सरकारी तिजोरी प्रिमीयमने भरणार असली तरी मुंबईसह वेगवेगळ््या शहरांची स्थिती भीषण होईल. राज्यातील शेतकऱ्यांवर गेल्या वर्षभरात दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट अशी संकटे आली. खरीपाची पिके नष्ट झाली रब्बीवरही संकट कोसळले. शेतकरी अत्यंत हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा धोरणात्मक निर्णय अर्थसंकल्पात अपेक्षित होता. तसे काहीच झालेले नाही हे राज्याचे दुर्दैव आहे. सत्ताधारी भाजपा सरकारने खर्चाला ४० टक्क्यांची कपात लागू केली. मागील अर्थसंकल्पातील अखर्चित राहिलेली रक्कम आगामी वर्षीच्या अर्थसंकल्पात वेगवेगळ््या प्रकल्पांकरिता तरतूद म्हणून दाखवण्याची चलाखी सरकारने केली आहे. अशी वितरीत न झालेली रक्कम वेगवेगळ््या कामाकरिता दाखवून घोषणांचा पाऊस पाडल्याचा बहाणा करणे ही जनतेची फसवणूक आहे.