शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

भयमुक्तीचा नारा का नाही?

By admin | Updated: January 4, 2016 03:18 IST

कॉँग्रेसमुक्त भारत, स्वच्छ भारत घोषणा दिल्या जातात, पण भयमुक्त भारत का नाही, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी रविवारी उपस्थित केला.

पुणे : कॉँग्रेसमुक्त भारत, स्वच्छ भारत घोषणा दिल्या जातात, पण भयमुक्त भारत का नाही, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी रविवारी उपस्थित केला. कला, संस्कृतीच्या संवर्धनासाठी संस्थात्मक काम व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.कलाछाया संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, कवी संजय विसपुते, नचिकेत पटवर्धन, मीना चंदावरकर उपस्थित होते. असिहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करून वाजपेयी यांनी साहित्य अकामदीचा पुरस्कार सर्वप्रथम परत केला. त्यानंतर ते पहिल्यांदाच पुण्यात आले होते.वाजपेयी म्हणाले, राजकीय, आर्थिक मुद्द्यांचा कलांवर परिणाम होतो. कलांना, अभिव्यक्तीला विरोध हा ५० वर्षांपासून चालत आलेलाच आहे. पण याकडे साहित्य क्षेत्राचे लक्षच गेलेले नाही. पुरस्कार परत केला तेव्हा या गोष्टीकडे संपूर्ण देशाचे लक्ष गेले. प्रांताप्रांताप्रमाणे कलाव्यवहार वेगवेगळे आहेत. त्याला नावे ठेवणारे वेगवेगळे आहेत. अनुचित प्रकारांवर लेखक, साहित्यिकांनी भाष्य करावे,अशी समाजाची अपेक्षा असते, पण त्याबाबत समाजाचीही काही जबाबदारी आहे.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सांस्कृतिक बाबींच्या संवर्धनासाठी काही संस्था पुढे आल्या, काही लोप पावल्या. काही संस्थांचे कार्य अद्यापही सुरू असल्याचे सांगून वाजपेयी म्हणाले, सर्वसामान्य समाज आणि अभिजात समाज अशी एक वर्गवारी केली जाते. ज्यांचा संस्कृती, कलांशी काही संबंध नाही अशा व्यक्ती मंत्रालयात अधिकारीपदावर आहेत. कलांविषयी त्यांना काही प्रश्न विचारला ते चुकीचे उत्तर बेधडकपणे देतात. रसिकांना जसे स्वातंत्र्य आहे तसेच कलाकारांनाही आहे. रसिकांसमोर ज्या गोष्टी येतात त्याचाच ते विचार करतात, अशी टिप्पणी त्यांनी केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन तणाव नसावा, असेही ते म्हणाले. कला, राजकीय क्षेत्रात पवित्र कुणीच उरले नाही, राजकारणात सर्वच वाईट आहेत असेही नाही, असे डॉ. आगाशे म्हणाले. (प्रतिनिधी)दिल्लीत ३० जानेवारीला सत्याग्रहदेशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. याविरोधात ३० जानेवारी रोजी दिल्लीत सत्याग्रह करण्यात येणार असल्याचे अशोक वाजपेयी यांनी या वेळी सांगितले.