शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जातनिहाय घोषणा का नाही?

By admin | Updated: October 21, 2015 02:57 IST

राज्यभरात तब्बल १२ हजार शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असताना, अनेक जिल्हा परिषदांनी रिक्त जागांची जात-संवर्गनिहाय माहिती जाहीर केलेली नाही.

- गजानन दिवाण,  औरंगाबादराज्यभरात तब्बल १२ हजार शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असताना, अनेक जिल्हा परिषदांनी रिक्त जागांची जात-संवर्गनिहाय माहिती जाहीर केलेली नाही. ती जाहीर केल्यास कुठल्याही नियमात बदल न करता अनेक शिक्षकांचा संसार सुखाचा होऊ शकतो. मात्र, माहिती जाहीर न करता, सर्वच जिल्हा परिषदांनी पडद्यामागील आर्थिक उलाढालींना एकप्रकारे खतपाणी घातले आहे. रिक्त जागांची माहिती राज्यातील कुठलीच जिल्हा परिषद देत नाही. त्यामुळे शिक्षक आंतरजिल्हा बदली समितीने माहिती अधिकाराचा आधार घेऊन आकडेवारी मिळविली, त्यात २२ जिल्हा परिषदांची स्थिती समजली. त्यातील केवळ चार जिल्हा परिषदांनी रोस्टर पूर्ण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. इतर सर्व जिल्हा परिषदांमध्ये रोस्टर पूर्ण नसल्याने शिक्षकांना समाधानकारक माहितीही मिळत नाही. आपल्या मर्जीतील शिक्षकाची वर्णी लावण्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्याचा गैरफायदा घेत, पडद्यामागून आर्थिक उलाढाल करीत शिक्षकांच्या जागा भरण्याचा उद्योग जिल्हा परिषदांकडून केला जातो, असा आरोप अनेक शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. शिक्षकांच्या आरोपांत तथ्य आहे, असे वाटण्यास कारणीभूत ठरतील, अशा अनेक घटना अलीकडच्या काळात उघड झाल्या आहेत. एकही जागा रिक्त नसताना ९०० वर जागा भरण्याचे बीडचे प्रकरण असेल किंवा मग सर्व नियम पायदळी तुडवत अतिरिक्त तुकड्यांना मंजुरी देणारे लातूरचे प्रकरण. एकही जागा रिक्त नाही, असे सांगणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात अलीकडेच शिक्षणसेवकांच्या ३१६ जागा भरण्यात आल्या. आंतरजिल्हा बदलीसाठी एनओसीसह तयार असलेल्या १७०० फाईल्स बाजूला ठेवून ही भरती करण्यात आली. औरंगाबादमध्ये याच पद्धतीने माध्यमिक शिक्षणसेवकांच्या ७४ जागा भरण्यात आल्या. या जिल्ह्यातदेखील ६०५ शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असून, ४५ शिक्षकांनी एनओसीही आणली आहे. नागपूर, भंडाऱ्यात अतिरिक्त शिक्षक आहेत. मात्र उपरोक्त जिल्ह्यांचे रोस्टर अपूर्ण आहे. रिक्त जागा आणि बदल्यांचे प्रस्ताव पाहिल्यास अर्ध्यापेक्षा जास्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागू शकतो. कुठल्या जात संवर्गातल्या जागा रिक्त आहेत, हे समोर येत नाही.