शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला ओबीसीमध्ये का समाविष्ट केले नाही : कोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 05:26 IST

मुंबई : अन्य मागास प्रवर्गात (ओबीसी) मराठा समाजाचा समावेश का करण्यात आला नाही? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सामाजिक आणि ...

मुंबई : अन्य मागास प्रवर्गात (ओबीसी) मराठा समाजाचा समावेश का करण्यात आला नाही? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) हा स्वतंत्र प्रवर्ग का निर्माण करण्यात आला? असे सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारले.‘राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार ओबीसी आणि एसईबीसी एकच आहेत, तर त्यांनी स्वतंत्र प्रवर्ग निर्माण का केला? मराठा समाजाचा ओबीसीमध्येच समावेश करून, सरकारने त्यांना त्याच प्रवर्गामधून १६ टक्के आरक्षण द्यायला हवे होते. असे वर्गीकरण का केले?’ असा प्रश्न न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने केला.

सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील व्ही. थोरात यांनी सांगितले की, मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्याच्या हेतूने सरकारने हा निर्णय घेतला. त्यामुळेच स्वतंत्र प्रवर्ग निर्माण केला. घटनेचे अनुच्छेद १५ (४) व १६ (४) अंतर्गत सरकारला मागास प्रवर्ग ओळखण्याची व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपाययोजना आखण्याचे अधिकार आहेत.

सरकारने राष्ट्रपतींना डावलून मराठा आरक्षण दिल्याचा आरोप, आरक्षणाविरोधात दाखल केलेल्या सर्व याचिकाकर्त्यांनी केला आहे.