शिर्डी : स्टेट बँक आॅफ इंडियासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने ६३ धनदांडग्या उद्योगपतींची ७,०१६ कोटी रूपयांची कर्जे माफ केली, मग शेतकऱ्यांची का केली नाहीत, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. राहाता येथे विखे यांनी सरकारच्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतला. नोटबंदीतून काळा पैसा बाहेर येणार असेल, तर त्यातून शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे. कारण त्यावर पहिला हक्क सध्या हाल सहन करणाऱ्या शेतकरी आणि सर्वसामान्यांचाच आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही?
By admin | Updated: November 17, 2016 04:48 IST