शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
7
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
8
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
9
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
10
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
11
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
12
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
13
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
14
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
15
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
16
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
17
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
18
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
19
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
20
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"

शस्त्रपूजा हवी कशाला?

By admin | Updated: October 25, 2015 01:40 IST

देश स्वतंत्र झाला आहे. देशात आपलेच सरकार आहे. परकीय देशाने आक्रमण केले तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी सैन्य आहे. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहेत.

नागपूर : देश स्वतंत्र झाला आहे. देशात आपलेच सरकार आहे. परकीय देशाने आक्रमण केले तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी सैन्य आहे. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहेत. एकूणच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज आहे. या स्थितीत जेव्हा शस्त्राची पूजा केली जाते तेव्हा लोकांनी शस्त्र वापरावे, असा संदेश जातो. त्यातून हिंसक प्रवृत्ती वाढते. क्रूरता वाढते. तेव्हा शस्त्रपूजेची आवश्यकता काय? यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) देशात अराजकतेला आमंत्रण द्यायचे आहे का? असा थेट सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केला.शनिवारी रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, फरिदाबाद येथे एका दलित कुटुंबाच्या घराला आग लावून दोन चिमुकली मुले जाळण्यात आली. ते या शस्त्रपूजेचेच प्रतीक आहेत. जोपर्यंत शस्त्रपूजा सुरू राहील, तोपर्यंत देशात हिंसकवृत्ती जोपासली जाईल. ही हिंसकवृत्ती काही प्रमाणात मुस्लिमांंच्या विरोधात गोहत्येच्या रूपात वापरली जाते तर दलितांच्या विरोधात क्रूरतेने वापरली जाते. शस्त्रपूजेचे परिणाम आता उघडपणे दिसू लागले आहेत. लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. स्वत:च्या रक्षणासाठी त्यांनाही शस्त्राची गरज वाटू लागली आहे. शस्त्र वापरण्याचा परवाना मिळावा म्हणून माझ्याकडे मागील महिनाभरात तब्बल ४० अर्ज आले आहेत. आरएसएस आतापर्यंत काय करत होता, हे महत्त्वाचे नाही. परंतु सध्या केंद्रात आणि राज्यात आरएसएसप्रणीत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे व वागणे हे शांततेचेच असायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले. चार्वाकापासून ते तुकारामापर्यंत यांनीसुद्धा धर्म सांगितला आहे. परंतु त्यात शस्त्राची पूजा कुठेही सांगितलेली नाही. काही राजघराण्यात शस्त्रपूजा केली जाते. परंतु ती शस्त्रपूजा ही व्यक्तिगत बाब असते. मनुवादी जातीव्यवस्थेचा विचार केला तर अवजारांची पूजा केली जाते. परंतु ती त्यांच्या रोजच्या वापराची असतात. ती शस्त्रे नाहीत. तसेच जातीव्यवस्थेमध्ये ब्राह्मणांना तर कुठलेही शस्त्र वापरण्याची परवानगीच नाही. इतिहासात अशोक विजयादशमीचा दिवस आहे. त्या दिवशी सम्राट अशोकाने शस्त्रे खाली टाकली होती. म्हणजेच तो दिवस हिंसा त्यागण्याचा दिवस आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिकरीत्या शस्त्रपूजा का केली जात आहे, याचा खुलासा मोहन भागवत यांनी करावा, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.(प्रतिनिधी)आठवले-पासवान हे बुजगावणेवाजपेयी यांच्या काळात भाजपची पर्यायी घटना मी स्वत: सभागृहात उघड केली होती. याची जाणीव खा. रामदास आठवले, रामविलास पासवान आणि उदित राज यांना आहे. भाजपला घटना बदलवायची आहे, हे उघड असताना ते त्यांच्यासोबत आहेत. एखाद दुसऱ्या मुद्यावर ते विरोध करतात. तेव्हा सत्तेत राहायचे व विरोधात बोलायचे हे काही बरोबर नाही. धोरण पटत नसेल तर बाहेर पडा, बुजगावण्यासारखे राहू नका, असे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.