शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अशा सरकारचा चहा तरी कशाला प्यायचा?

By admin | Updated: July 12, 2015 02:49 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, एफआरपी नुसार ऊसाला भाव नाही, कारागृहातून कैदी पळून जात आहेत, विषारी दारु पिऊन १०० लोक मेले तरी सरकार संवेदनशिल नाही त्यामुळे अशा

- अतुल कुलकर्णी,  मुंबईशेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, एफआरपी नुसार ऊसाला भाव नाही, कारागृहातून कैदी पळून जात आहेत, विषारी दारु पिऊन १०० लोक मेले तरी सरकार संवेदनशिल नाही त्यामुळे अशा सरकारचा अधिवेशनाच्या आधी चहा तरी कशाला प्यायचा अशी भूमिका घेत सोमवारपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होत असलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात विरोधक आहेत.गेल्या आठ महिन्याच्या काळात भाजपा शिवसेना सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर आहे. स्वच्छ कारभाराची आणि तात्काळ निर्णयाची हमी देणारे हे सरकार आठ महिन्यातच सपशेल अपयशी ठरल्याची अनेक उदाहरणे आमच्याकडे आहेत जी आम्ही सभागृहात मांडू, असे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.रविवारी दुपारी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची बैठक होईल. त्यात अधिवेशनाच्या काळात कोणते विषय कोणत्या दिवशी सभागृहात मांडायचे यावर चर्चा होईल. त्यानंतर दुपारी विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे.लोकमतशी बोलताना विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी म्हणून राज्यभर आंदोलन केले. तरीही सरकारला जाग येत नाही. शेतकरी उपाशी असताना सरकारची सरकारची चहा बिस्कीटे कशाला घ्यायची असे आपले मत आहे. मात्र उद्या होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होईल आणि आम्ही तसे सरकारला कळवून टाकू. मुख्यमंत्र्यांच्याच गावातजेलमधून कैदी पळून जातात, मुंबईत विषारी दारुने १०० बळी घेतले तरीही मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि मनपा आयुक्त तेथे भेट द्यायलाही गेले नाहीत इतके हे सरकार असंवेदनशिल बनले आहे असेही विखे म्हणाले.विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे लोकमतशी बोलताना म्हणाले, शेतकरी संकटात आहे त्यांच्या कर्जमाफीची पहिली मागणी पक्षाचे नेते शरद पवार यांनी केली होती. त्यावर सरकारला धारेवर धरु, घोटाळ्यातल्या मंत्र्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी त्या पदावर राहू नये अशी मागणी आपण करणार आहोत आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याची अनेक उदाहरणे आम्ही अधिवेशनात मांडू असेही ते यावेळी म्हणाले.