शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

‘शिवाजी पार्कवर ध्वनिक्षेपकाची परवानगी का दिली?’

By admin | Updated: January 19, 2017 06:04 IST

रथयात्रेदरम्यान ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी दिल्याने संबंधित पोलिसांवर काय कारवाई केलीत? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली.

मुंबई : शिवाजी पार्क ‘शांतता क्षेत्रात’ मोडत असतानाही गेल्या शनिवारी-रविवारी येथ आयोजित करण्यात आलेल्या जगन्नाथ रथयात्रेदरम्यान ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी दिल्याने संबंधित पोलिसांवर काय कारवाई केलीत? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. २३ जानेवारीपर्यंत सरकारला यासंदर्भात उत्तर देण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले.‘शांतता क्षेत्रात’ ध्वनिक्षेपक वापरू नयेत, असा निर्णय उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला आहे. तसेच राज्य सरकारनेही काही दिवसांपूर्वीच अधिसूचना काढून ध्वनिप्रदूषण नियमांच्या अधीन राहूनच ‘शांतता क्षेत्रा’त ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी दिली जाईल, असे म्हटले आहे. नियमानुसार, शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपक लावले जाऊ शकत नसतानाही शिवाजी मैदान पोलीस ठाण्याने जग्गनाथ रथयात्रेच्या आयोजकांना ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी दिली. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विकॉम ट्रस्टने अर्जाद्वारे उच्च न्यायालयाकडे केली आहे. त्यावर न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने पोलिसांवर काय कारवाई केलीत? अशी विचारणा राज्य सरकारकडे केली. ‘संबंधितांवर काय कारवाई केलीत ते सोमवारपर्यंत सांगा. आम्हीही त्यांच्यावर अवमानाची कारवाई करू,’ असे म्हणत खंडपीठाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)