शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोणाची डेडलाइन खरी? मुख्यमंत्री म्हणतात ५ आॅगस्ट; कुलगुरू म्हणतात १५ आॅगस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 05:02 IST

मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल ५ आॅगस्टपर्यंत लावले जातील, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आज निकालाची डेडलाइन विधानसभेत जाहीर केली.

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल ५ आॅगस्टपर्यंत लावले जातील, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आज निकालाची डेडलाइन विधानसभेत जाहीर केली. मात्र, तिकडे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी निकाल १५ आॅगस्टपर्यंत लागतील, असे जाहीर केल्याने निकालाची कोणती डेडलाइन खरी, मुख्यमंत्र्यांची की कुलगुरूंची असा प्रश्न निर्माण झाला आहे.मुंबई विद्यापिठांच्या निकालांना उशीर झाला असला तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. परदेशात शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना १५ आॅगस्टपर्यंत गुणपत्रिका देण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. उशिरा निकाल लागल्याने भविष्यातील संलग्न परीक्षांवर परिणाम होऊ, नये यासाठी तावडे यांनी संबंधित फोरमशी चर्चा केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.मुंबई विद्यापीठाच्या निकालांना होत असलेल्या विलंबाचे पडसाद आज सभागृहात उमटले. योग्य वेळेत निकाल लावण्यात मुंबई विद्यापीठ नापास झाले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे देखील अपयशी ठरले आहेत. आॅनलाइन मूल्यांकनाचा प्रयोग फसला असून याचा पुढील परीक्षांवरही विपरित परिणाम होईल, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.त्यावर मुंबई विद्यापीठात आॅनलाइन मूल्यांकनाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने झाली असती तर गोंधळ उडाला नसता, अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली.विद्यापीठाची आता तिसरी डेडलाइनमुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी सर्व निकाल ५ आॅगस्टपर्यंत जाहीर होतील, असे सांगितले होते. रखडलेल्या निकालांबाबत युवा सेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची भेट घेतली. त्यावेळी लाखो उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी असल्याने विधि आणि वाणिज्य शाखेचे निकाल लागण्यास १५ आॅगस्ट उजाडेल, असे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी त्यांना सांगितले.विधि शाखेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी औरंगाबाद विद्यापीठातून २५ प्राध्यापकांना बोलवले आहे. तसेच ‘एसएनडीटी’मधूनही प्राध्यापकांना बोलवणार आहेत.५ आॅगस्टपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले नाहीत तर विद्यापीठाला टाळे ठोकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी दिला.