शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अख्खे कुटुंबच रिंगणात!

By admin | Updated: February 10, 2017 01:38 IST

महापालिका प्रभाग १७ मध्ये राजू लोखंडे, त्यांच्या पत्नी, वहिनी, पुतण्या, भाचा असे अख्खे लोखंडे कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

मंगेश व्यवहारे, नागपूरमहापालिका प्रभाग १७ मध्ये राजू लोखंडे, त्यांच्या पत्नी, वहिनी, पुतण्या, भाचा असे अख्खे लोखंडे कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. अनुसूचित जाती गटातून भारिप बहुजन महासंघाकडून राजू लोखंडे यांच्या विरोधात त्यांचा भाचा प्रशांत ढाकणे हे काँग्रेसकडून उभे आहेत. सर्वसाधारण महिला गटातून राजू लोखंडे यांच्या पत्नी मीनाक्षी लोखंडे तर पुतण्या आकाश लोखंडे हे सर्वसाधारण गटातून भारिप बहुजन महासंघाकडून उभे आहेत. विशेष म्हणजे, राजू लोखंडे यांचे मोठे बंधू रमेश लोखंडे यांच्या पत्नी सत्यभामा लोखंडे या प्रभाग ३३ सर्वसाधारण महिला गटातून बहुजन समाज पार्टीकडून रिंगणात आहे. महापालिकेच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील पाच जण उभे असल्याची कदाचित ही पहिलीच घटना घटना म्हणावी लागेल. प्रभाग क्र. २५ मध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेविका कुमुदिनी कैकाडे यांच्याऐवजी त्यांचे पती श्रीकांत यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार होती. परंतु पक्षाने कैकाडे कुटुंबाची दखल न घेतल्याने, एकाच प्रभागातून पती-पत्नीने अपक्ष म्हणून दंड थोपटले आहे. शिवसेनेचे नगरसेवक बंडू तळवेकर हे प्रभाग ४ मधून रिंगणात आहेत. प्रभागात केलेल्या आपल्या कामाचा फायदा आपल्या घरातच झाला, तर काय वाईट, या उद्देशातून त्यांनी पत्नी सुरेखालाही अपक्ष म्हणून रिंगणात उतरविले आहे. उत्तर नागपुरातील बसपाच्या नगरसेविका हर्षला जयस्वाल या प्रभाग ६ मधून अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तर त्यांचे पती संजय जयस्वाल हे प्रभाग ७ मधून रिंगणात आहेत. पती-पत्नीबरोबरच मायलेकसुद्धा रिंगणात आहे. काँग्रेसचे उमेदवार कमलेश चौधरी यांना काँग्रेसने प्रभाग १४ मधून उमेदवारी दिली आहे, तर त्यांची आई मीना चौधरी या प्रभाग १२ मधून अपक्ष म्हणून लढत आहे. मायलेकाबरोबर बहीण-भावालाही सत्ता हवी आहे, त्यामुळे भाजपाचे प्रवीण भिसीकर व त्यांची बहीण यशश्री नंदनवार हे दोघेही प्रभाग ५ आणि २० मधून रिंगणात आहेत. नणंद-भावजयीचे वैर सर्वश्रुतच आहे. महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ३६ मध्ये याची प्रचिती येते. माजी नगरसेविका पल्लवी श्यामकुळे यांच्याविरुद्ध त्यांच्या भावाच्या पत्नी प्रज्ञा पन्नासे उभ्या ठाकल्या आहे. नात्यांमध्ये रंगलेल्या दंगलीबद्दल उत्सुकता आहे.