शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

राणेंना कोण नको म्हणणार?

By admin | Updated: March 27, 2017 03:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे नारायण राणे, प्रकाश आवाडे यांच्यासारखे काँग्रेस नेते जर भाजपमध्ये येत

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे नारायण राणे, प्रकाश आवाडे यांच्यासारखे काँग्रेस नेते जर भाजपमध्ये येत असतील तर त्यांना नको कोण म्हणेल, असा सूचक प्रतिप्रश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांना केला.कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यालय उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या राणे आणि आवाडे यांच्या प्रवेशाबद्दल मला माहीत नाही; परंतु त्या-त्या भागांतील नेते, कार्यकर्त्यांशी बोलून असे निर्णय घेतले जातात. ते काम प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे करतील. राणे हे शिवसेनेत जातील की भाजपमध्ये अथवा काँग्रेसमधून बाहेर पडणारच नाहीत, हे कोणीही सांगू शकत नाही. पण हवी-हवीशी वाटणारी अशी माणसे फार कमी असतात, असेही पाटील यांनी सांगितले.राज्यात मध्यावधी निवडणुकांची चर्चा असली तर ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली. २८८ पैकी जवळपास २०० आमदार आमचे आणि शिवसेनेचे असल्यानंतर ही चर्चा निरर्थक आहे. वादाचे अनेक विषय असतात. त्यावरून मतभेद होतात. मंत्रिपदे, त्यांचा दर्जा, त्यांची जबाबदारी असे अनेक विषय असतात. घरात पती-पत्नीचेही नेहमी भांडण होत असते तसेच हे विषय आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या चर्चेमध्ये काही अर्थ नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) ‘मातोश्री’वर जाणार नाहीचंद्रकांतदादा पाटील म्हणाले, मी आणि सुधीर मुनगंटीवार ‘मातोश्री’वर जाणार असल्याची चर्चा आहे; पण आता तसे काही कारण नाही. मात्र, उत्तर प्रदेशच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना अभिनंदनाचा फोन केला होता तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना सपत्निक भोजनाचे निमंत्रण दिले आहे, असे त्यांनी सांगितले.