शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

काळ ठरवेल शरद पवारांचा वारस कोण - सुप्रिया सुळे

By admin | Updated: November 4, 2016 04:54 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाकडे राहणार याबाबत राजकिय वर्तुळात नेहमीच चर्चा होत असते.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 3 - यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांना मानसपुत्र मानले होते, आता शरद पवार यांचा वारस कोण असेल हे काळच ठरवेल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी केले. शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार याविषयी नेहमी तर्कवितर्क लढविले जातात, याकडे लक्ष वेधल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी हे भाष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला येत्या २२ फेब्रुवारी २०१७ रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्यावतीने निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती देण्यासाठी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘आघाडी सरकार सत्तेवर असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामुख्याने भर देण्यात आला. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता भाजपचे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी वर्गामध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे, यावर संसदेमध्ये आवाज उठविणार आहे. कोपर्डी प्रकरण हाताळण्यातही सरकार अपयशी ठरले आहे, या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे.’’आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर आरक्षण हे सुळे, आठवले, आंबेडकर यांच्या मुलांना नको असून ते वंचितांसाठी हवे आहे,असेही सुळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)