शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकांच्या असंख्य प्रश्नांना उत्तरे कोण देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 03:07 IST

बँक नक्की बंद आहे का? एटीएममध्ये पैसे असूनही ते बंद का आहे? उद्या तरी सर्व सुरू राहणार आहे का? इमर्जन्सी असेल तर आम्ही पैसे कुठून काढायचे?

ठाणे : बँक नक्की बंद आहे का? एटीएममध्ये पैसे असूनही ते बंद का आहे? उद्या तरी सर्व सुरू राहणार आहे का? इमर्जन्सी असेल तर आम्ही पैसे कुठून काढायचे? आमच्याकडच्या हजार-पाचशेच्या नोटा नक्की घेतल्या जाणार ना? अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार बुधवारी ठाण्यातील अनेक एटीएम, बँकांच्या बाहेर सुरू होता आणि त्याला तोंड देत होते, कंत्राटी पद्धतीने १२ तासांकरिता नियुक्त केलेले सुरक्षारक्षक. सुट्या पैशांअभावी लोकांना सहन कराव्या लागणाऱ्या हालअपेष्टांची अभिव्यक्ती एखादी शिवी हासडून केली जात होती किंवा एखादा एटीएम मशीनवर बुक्की घालून नापसंती व्यक्त करीत होता.पंतप्रधान मोदी यांनी नोटा रद्द केल्याची घोषणा करताच मंगळवार रात्रीपासून एटीएमबाहेर लांबचलांब रांगा लागल्या होत्या. प्रारंभी सुटे पैसे मिळवण्यात काहींना यश आले. मात्र, काही वेळातच मशीनमधील पैसे संपले. ज्यांना मंगळवारी रात्री पैसे मिळाले नाहीत ते किंवा ज्यांच्याकडील सुटे पैसे संपल्याने चणचण भेडसावू लागली, ते बुधवारी सकाळपासून एटीएमबाहेर घिरट्या घालून ‘लक असेल आणि मिळाले पैसे तर बघू’ या विचाराने येत होते. सकाळी ९ ते १० दरम्यान एटीएमच्या बाहेर गर्दी होती. एटीएम बंद असल्याचे सुरक्षारक्षकाने सांगूनही काही जणकार्ड टाकून खातरजमाआणि आपली नाराजी प्रकट करत होते. दररोज बँकेत पायधूळ झाडणारे छोटे व्यापारी, दुकानदार हेही आले होते. घोळक्याघोळक्यांत उभे राहून चर्चा करीत होते. ‘काळापैसा बाहेर काढण्याकरिता निर्णय चांगला आहे, हे खरे पण सामान्य माणसाला या निर्णयामुळे किती त्रास होत आहे, ते मोदींना कळत नाही’, असा सूर काहींनी लावला होता. ‘घरी हजार-पाचशेच्या चार नोटा असल्या तरी त्या बदलण्यासाठी कामधंदे सोडून आता उद्या बँकेत धावत यावे लागणार. आज बँका बंद न करता आजपासूनच सुटे पैसे देण्याचे नियोजन अगोदर केले असते, तर लोकांचे हाल झाले नसते’, असाही मतप्रवाह होता.काही महिला, गोरगरीब कामगार हजार-पाचशेच्या नोटा घेऊन बँकेपाशी आले व त्यांनी तेथील सुरक्षारक्षकांना या नोटा बदलून मिळणार की नाही, असा भयकंपित स्वरात सवाल केला. त्यांची समजूत काढताना व त्यांना उत्तरे देताना सुरक्षारक्षकांची पुरेवाट होत होती. कुणाला क्लासची फी भरायला पैसे हवे होते, तर कुणाला डॉक्टरकडे जाण्याकरिता पैशांची गरज होती. मात्र बँक, एटीएम बंद असल्याने हताश होऊन ते परत जात होते. किरकोळ भाजी-फळविक्रेते सुटे द्यायला तयार नाही. पाचशेची नोट ठेवून घेताहेत आणि काय करायचं, बायकांच्या घोळक्यात चर्चा सुरू होती. उद्या तरी मिळतील ना रे पैसे, असा सवाल त्या रक्षकांना करीत होत्या. एरव्ही, एटीएम बंद असले तरी कधी आम्हाला इतका त्रास होत नाही. काल रात्री उशिरापर्यंत लोकांच्या रांगा लागल्या होत्या. लोकांची भांडणे सोडवताना आमची पुरेवाट झाली. आज मशीन बंद असल्याने लोकांची बोलणी खातोय. खूपच त्रास झालाय. लोक आमच्यावरच राग काढत आहेत, अशी खंत एटीएमबाहेरील सुरक्षारक्षकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)