शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

एलफिन्स्टन रोड स्टेशनवाले ‘एलफिन्स्टन’ कोण होते?

By admin | Updated: May 8, 2017 06:55 IST

पश्चिम रेल्वेवरील ‘एलफिन्स्टन रोड’ स्टेशनचे नाव आता ‘प्रभादेवी’ असे करण्यात आले आहे. १८६७ साली रेल्वेप्रवाशांच्या सेवेत

ओंकार करंबेळकर/  लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पश्चिम रेल्वेवरील ‘एलफिन्स्टन रोड’ स्टेशनचे नाव आता ‘प्रभादेवी’ असे करण्यात आले आहे. १८६७ साली रेल्वेप्रवाशांच्या सेवेत आलेल्या या स्थानकाचे नाव मुंबईचे गव्हर्नर जॉन एलफिन्स्टन यांच्या स्मृतीसाठी देण्यात आले होते. माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टन हे जॉन एलफिन्स्टन यांचे काका होते. मुंबईच्या इतिहासामध्ये जॉन माल्कम, माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टन, बार्टल फ्रिअर यांनी जसा आपल्या कामाचा ठसा उमटवला, त्याप्रमाणे जॉन यांचेही एक महत्त्वाचे गव्हर्नर म्हणून नाव घेतले जाते.जॉन एलफिन्स्टन यांच्या कारकिर्दीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्या कार्यकाळामध्ये १८५७ चा उठाव झाला. या उठावाच्या काळामध्ये मुंबई प्रांतामध्ये विविध ठिकाणी झालेली लहानसहान बंडाची प्रकरणे त्यांनी मिटवली. खुद्द मुंबईमध्येही बंडाची कुणकुण लागताच, तीही तत्काळ शमवून टाकली होती. बंडाच्या योजनांमध्ये नसणारी एकी, तसेच संघटित प्रयत्नांचा अभाव असल्यामुळे, मुंबईमध्ये बंड शमवण्यात कंपनीला सहज यश आले. इतकेच नाही, तर मुंबईत विविध धर्माच्या लोकांनी कंपनी सरकारला पाठिंबा असणारी पत्रेच जॉन एलफिन्स्टनला सादर केली होती. त्यामुळे मुंबईमध्ये बंड शमवण्यात फारसा त्रास सहन करावा लागला नाही. १८५८ साली राणी व्हिक्टोरियाने बंड शमवल्यानंतर काढलेला जाहीरनामा मुंबईतही वाचून दाखवला, त्या प्रसंगीही जॉन एलफिन्स्टन हजर होते. १८५९ साली जॉन एलफिन्स्टन पुन्हा लंडनला निघून गेले आणि त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांचा मृत्यू झाला.एलफिन्स्टन सर्कलसाठी पाठिंबादक्षिण मुंबईतील एका दुर्लक्षित जागेवर बाग बांधून त्याच्या सभोवती इमारती बांधाव्यात, अशी कल्पना तत्कालीन पोलीस कमिशनर चार्ल्स फोर्जेट यांनी मांडली. त्याला जॉन एलफिन्स्टन यांनी नंतर बार्टल फ्रिअर यांनी पाठिंबा दिला आणि मदतही केली. त्यानंतर, या जागेवर बागेच्या विकासाला सुरुवात झाली आणि १८७२ साली ही बाग बांधून झाली. जॉन एलफिन्स्टन यांनी केलेल्या मदतीच्या आणि स्मृतिप्रीत्यर्थ तिचे नाव एलफिन्स्टन सर्कल असे ठेवण्यात आले, स्वातंत्र्यानंतर बेंजामिन हॉर्निमन यांच्या नावाने बागेचे ‘हॉर्निमन सर्कल’ असे करण्यात आले. आजही हॉर्निमन सर्कलजवळ मोठ्या बँकांची व कंपन्यांची कार्यालये आहेत.रॉयल हॉर्स गार्डपासून कारकिर्दीला सुरुवात२३ जून १८०७ रोजी जन्मलेल्या जॉन एलफिन्स्टननी १८२३ साली लष्करामध्ये प्रवेश केला. त्या वेळेस सर्वात प्रथम त्यांची नेमणूक रॉयल हॉर्स गार्डमध्ये झाली. १८२८ मध्ये लेफ्टनंट आणि १८३२साली कॅप्टन अशा नोकरीत ते पायऱ्या चढू लागले. त्यानंतर, १८३७ साली मद्रास प्रांताच्या गव्हर्नरपदी त्यांची नेमणूक झाली, या काळामध्ये त्यांनी निलगिरीमध्ये एक घरही बांधले होते. १८४५ ते १८५३ या काळामध्ये इंग्लंडमध्ये नोकरी केल्यानंतर, त्यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक झाली.