शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बापाने विकलेल्या तिचा रक्षणकर्ता कोण?

By admin | Updated: March 1, 2017 05:34 IST

पोटच्या मुलीची पुढे अनेकदा विक्री झाली. देह व्यापारात अडकलेल्या या मुलीची स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने सुटका झाली.

राहुल अवसरे,नागपूर- दारुड्या बापाने विकलेल्या पोटच्या मुलीची पुढे अनेकदा विक्री झाली. देह व्यापारात अडकलेल्या या मुलीची स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने सुटका झाली. आता या दुर्दैवी अल्पवयीन मुलीला पुन्हा देहव्यापारात गुंतवण्याचा प्रयत्न होत असून तिच्या कथित मावशीने मागितलेला तिचा ताबा न्यायालयाने फेटाळला आहे. ही १७ वर्षीय मुलगी राजस्थानच्या जहाजपूर जिल्ह्यातील आहे. दारूच्या आहारी गेलेल्या तिच्या वडिलाने तिची विक्री माधवपुरा चौथका बरवाडा येथील ग्यानताबाई हिला केली होती. ग्यानताबाईने एक-दीड वर्षे तिच्याकडून देहव्यापार करवून घेतला होता. तिला मुलगा झाला, तिचे मूल हिसकावून पुन्हा तिच्याकडून व्यवसाय करवून घेतला. ही मुलगी रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या वडिलांकडे गेली होती. पुन्हा दारुड्या बापाने आपल्या चुलत भावाकडे तिचा ताबा देऊन तिला नागपूरला पाठविले होते. या ठिकाणी तिला विकण्यात आले. इंदिराबाई हट्टेसिंग कालखोर ही या मुलीला आपल्या ताब्यात ठेवून तिच्याकडून देहव्यापार करवून घेत होती. पीडित मुलगी ही आपल्या बहिणीची मुलगी आहे, असा दावा करून तिचा ताबा मागणाऱ्या धनीदेवीचा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. दास यांच्या न्यायालयाने फेटाळला. सरकारी वकील माधुरी मोटघरे यांनी धनीदेवी ही पुन्हा पीडित मुलीला देह व्यापारात गुंतवण्याची शक्यता असून तिचा अर्ज फेटाळल्या जावा, अशी विनंती न्यायालयाला केली होती. त्यानुसार न्यायालयाने निर्णय दिला. परंतु तिचा रक्षणकर्ता कोण, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.>स्वयंसेवी संस्थेचा पुढाकारएका स्वयंसेवी संस्थेला या मुलीची कर्मकहाणी समजली. पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली. २३ नोव्हेंबर २०१६ रोजी गंगाजमुनातील इंदिरा कालखोरच्या कोठ्यावर धाड घालून या मुलीची सुटका करण्यात आली. पोलिसांनी गुन्हे दाखल करून इंदिरा कालखोर, हिम्मो गोपाल कालखोर आणि राधिका गोपाल कालखोर यांना अटक केली. तर तिला शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले आहे.