शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य संचालकांना पाठीशी घालणारे कोण?

By admin | Updated: April 12, 2016 03:25 IST

सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा सोयीचा अर्थ काढून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे वरिष्ठ अधिकारी नेमके आहेत तरी कोण

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा सोयीचा अर्थ काढून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे वरिष्ठ अधिकारी नेमके आहेत तरी कोण, त्यांची नावे आणि माहिती तातडीने सादर करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. गोरगरीब रुग्णांच्या औषधांमध्ये हेळसांड करताना संचालकांच्या पद राखण्याच्या प्रयत्नांची चर्चा दिवसभर विधिमंडळात होती.संचालक होण्यासाठी पात्र नसताना सतीश पवार यांना ते पद दिले गेले होते. त्याविरोधात काही अधिकारी न्यायालयात गेले. ‘मॅट’पासून सर्वाेच्च न्यायालयापर्यंत सगळीकडे पवार यांना हार पत्करावी लागली. राज्य लोकसेवा आयोगामार्फत संचालकांचे पद भरा आणि ती नेमणूक होईपर्यंत पवार त्या पदाचे काम पाहतील, असे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने पवार यांची याचिका फेटाळताना दिले होते. त्यानंतर एमपीएससीने संचालक पदासाठी जाहिरात दिली. त्याची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. त्यामुळे सध्यातरी पवार हेच संचालक आहेत. अशावेळी या पदाचे अधिकार बजावत असताना त्याचे होणारे भलेबुरे परिणाम पवार यांनीच भोगणे अपेक्षित आहे. असे असूनही सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाची भीती दाखवत पवार यांच्यावर कारवाई करणे योग्य होणार नाही, असे वरिष्ठ अधिकारी मंत्र्यांना सांगत होते. शेवटी मंत्र्यांनी विधी व न्याय विभागाच्या सचिवांना बोलावून त्यांचे म्हणणे लेखी देण्याचे आदेश दिले.दरम्यान, एमपीएससीचे निकाल जाहीर होताच त्यावर स्थगिती आणण्याची आणि पुन्हा सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत संचालक पदावर कायम राहण्याची खेळी खेळली जाईल असेही बोलले जात आहे. संचालक पवार यांना वाचविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पडद्याआड जोरदार प्रयत्न चालू होते. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना अर्धसत्य माहिती सांगितली जात होती. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणालाही माफ करू नका, ज्यांनी चुका केल्या आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी कठोर भूमिका घेतल्याचे आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले. (विशेष प्रतिनिधी)