शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

एसीबीची धुरा कोणाकडे?

By admin | Updated: August 1, 2016 04:41 IST

पदभार स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एससीबी) महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती होणार, याकडे पोलीस वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागून राहिले

जमीर काझी,

मुंबई- राज्याचे पोलीसप्रमुख म्हणून ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सतीश माथुर यांनी रविवारी पदभार स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एससीबी) महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती होणार, याकडे पोलीस वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. माथुर यांच्यानंतर ज्येष्ठ अधिकारी असलेले राकेश मारिया यांची त्या पदावर नियुक्ती होणे अपेक्षित असले तरी त्यांच्याबाबतच्या राज्य सरकारच्या ‘वक्र’ दृष्टीमुळे त्याबाबत अनिश्चितता कायम आहे. मात्र त्यांना डावलून अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे किंवा या पदावर अधिक काळ पूर्णवेळ अधिकारी न नेमणे राज्य सरकारला महागात पडण्याची चिन्हे आहेत. पोलीस गृहनिर्माण व कल्याण निधीचे सरव्यवस्थापक के.एल. बिष्णोई तीन महिन्यांनी सेवानिवृत्त होणार असून, दीक्षित रिटायर झाल्याने रिक्त झालेल्या डीजीच्या एका पदासाठी ते पात्र ठरलेले आहेत. मात्र मारिया यांना डावलण्यासाठी ते पद रिक्त ठेवल्यास बिष्णोई न्यायालयात जाऊ शकतात, तर मारिया यांच्याऐवजी विधि व तांत्रिक विभागाचे प्रमुख प्रभात रंजन यांची ‘एसीबी’पदी नियुक्ती केल्यास मारिया या निवडीला आव्हान देऊ शकतात, कारण राज्य सरकारने यापूर्वी उच्च न्यायालयात एका खटल्यात पोलीस महासंचालकानंतर एसीबीचे प्रमुखपद हे राज्यातील द्वितीय दर्जाचे पद असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे नमूद केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘एसीबी’च्या प्रभारीबाबत निर्णय घेताना सर्व बाबी विचारात घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’च्या नेतेमंडळीच्या गैरव्यवहाराची अनेक प्रकरणांची चौकशी ‘एसीबी’ करीत असताना या पक्षाच्या जवळचे असल्याच्या शिक्क्यामुळे मारिया यांची त्या पदावर नियुक्ती करणे भाग पडणार असल्याचे गृह खात्यातील वरिष्ठ अधिकारी व जाणकाराकडून सांगण्यात येत आहे. सध्या या पदाचा तात्पुरता पदभार विभागाचे अपर महासंचालक विवेक फणसाळकर यांच्याकडे आहे. २८ फेबु्रवारीला तत्कालीन प्रमुख विजय कांबळे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर जवळपास दोन महिने ‘एसीबी’ला पूर्णवेळ अधिकारी नव्हता. २५ एप्रिलला सतीश माथुर यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. या वेळी दोन महिने हे पद रिक्त ठेवणे सरकारला शक्य नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. >मारियांचा आग्रही पवित्रागेल्या वर्षी ७ सप्टेंबर मुंबईचे तत्कालीन आयुक्त राकेश मारिया यांची तडकाफडकी पदोन्नतीवर उचलबांगडी करण्यात आली होती. त्यामागे बहुचर्चित शीना बोरा खून प्रकरणाच्या तपासाचा संदर्भ होता. तेव्हापासून मारिया ‘होमगार्ड’चे महासमादेशक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यानंतर अनेक वर्षांनी कनिष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांना पोलीस गृहनिर्माण तसेच विधि व तांत्रिक विभागाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले आहे. आता मात्र एसीबी हे अत्यंत प्रतिष्ठेचे पद असल्याने तसेच सेवानिवृत्तीसाठी जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी राहिल्याने मारियाही त्यासाठी आग्रही राहण्याच्या पवित्र्यात असल्याचे सांगितले जाते.