शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री कोणाचे? युतीचे की आघाडीचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2016 00:53 IST

अतुल काळसेकर : प्रशासनाला योग्यवेळी झटके देणार

सावंतवाडी : आघाडीच्या सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांची मनमानी आम्ही सहन केली. मात्र, युतीचे सरकार आल्यानंतरही आम्हाला याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पालकमंत्री नेमके युतीचे की आघाडीचे, असा खडा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केला. तसेच भाजप पालकमंत्र्यांसह प्रशासनाच्या कामावर पूर्णत: नाराज असून, योग्य वेळी आम्ही झटके देऊ, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.ते येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे सरचिटणीस श्यामकांत काणेकर, तालुकाध्यक्ष मंदार कल्याणकर, मनोज नाईक, प्रभाकर सावंत, महिला तालुकाध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर आदी यावेळी उपस्थित होते.काळसेकर म्हणाले, मार्चमध्ये नियोजनचा आराखडा १२५ कोटीवर गेला आहे. त्याबद्दल पालकमंत्र्याचे आम्ही अभिनंदनही केले. मात्र, आजपर्यंत नियोजनच्या एकाही कामाची सुरूवात झाली नाही. निविदा प्रक्रियाच झाली नाही तर कामे कशी होणार, असा सवाल करीत काळसेकर यांनी अन्य जिल्ह्यात कामांची भुमिपूजने झाल्याची आठवण यावेळी करून देत गेले आठ महिने नियोजनची बैठकही घेण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात प्रशासनावर जेवढी नाराजी आहे, तेवढीच नाराजीही पालकमंत्र्यावर असून, आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे हे देवगड व सावंतवाडी मतदार संघात मनमानी कारभार करीत होते. त्याला रोखठोक उत्तर द्यायचे सोडून पालकमंत्री दीपक केसरकर हे समानतेची तागडी घेऊन बसले असून, त्यात सामान्य कार्यकर्ते दुरावत चालले आहेत, अशी खंत काळसेकर यांनी व्यक्त केली. याबाबत भाजपने वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेतली असून, प्रशासनाबरोबरच पालकमंत्र्यांना आम्ही झटके देऊ. मात्र, हे झटके कोणत्या स्वरूपाचे असतील ते त्यावेळीच कळतील, असे सांगत पालकमंत्र्यांच्या कामावर काळसेकर यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)मी दोनवेळा भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुुक नाही, असे सांगत पुन्हा फॉर्म भरणार नसल्याचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्पष्ट केले.- अतुल काळसेकर, भाजपा, जिल्हाध्यक्ष