शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या रडारवरील ते माजी मुख्यमंत्री कोण?

By admin | Updated: November 6, 2016 03:30 IST

सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांची, तसेच अनिवासी भारतीय बिल्डरची ३०० कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशी सुरू असल्याची

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांची, तसेच अनिवासी भारतीय बिल्डरची ३०० कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. हे माजी मुख्यमंत्री कोण याची सर्वाना उत्सुकता असून, शनिवारी दिवसभर राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू होती.हा बिल्डर सध्या दक्षिण मुंबईत एक गगनचुंबी निवासी इमारतींचे संकुल उभारत आहे. सदर माजी मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी ३०० कोटी रुपयांची रक्कम सायप्रस, मॉरिशस या देशांमधील काही कंपन्यांमध्ये शेअर्सच्या स्वरूपात वळविली आणि तिथून ती मुंबईतील या इमारतीच्या उभारणीसाठी गुंतवली, असे सांगण्यात येते. हे करताना १० रुपयांच्या शेअरची किंमत एक हजार रुपये दाखविण्यात आली.सक्तवसुली संचालनालयाने या प्रकरणात चौकशी सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, अधिक माहिती देण्यास नकार दिला. या प्रकरणात ईडीच्या रडारवर असलेल्या व्यक्तींना चौकशीसाठी लवकरच बोलाविले जाण्याची शक्यता आहे. आवश्यक त्या कागदपत्रांची छाननी करून संबंधितांना ईडीकडून चौकशीसाठी बोलाविले जाऊ शकते. त्यानंतर, गुन्हे दाखल करण्यात येतील. काही कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत. या माजी मुख्यमंत्र्यांनी एवढा पैसा कुठून आणला, तो कसा वळविला, याचीही चौकशी सुरू आहे. १० रुपयांच्या एका शेअरची किंमत हजार रुपयांपर्यंत वाढवायची आणि बनावट कंपन्यांच्या माध्यमातून ती पुन्हा मुंबईतील सदर टॉवरच्या उभारणीसाठी वळवायची, असे प्रकार करण्यात आले. या माजी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावे हे व्यवहार करण्यात आले होते का, ही बाबदेखील चौकशीच्या रडारवर आहे. (प्रतिनिधी) नातेवाईकांच्या नावे...१० रुपयांच्या एका शेअरची किंमत हजार रुपयांपर्यंत वाढवायची आणि बनावट कंपन्यांच्या माध्यमातून ती पुन्हा मुंबईतील सदर टॉवरच्या उभारणीसाठी वळवायची, असे प्रकार करण्यात आल्याचा आरोप होत आहे. याच माजी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या काही नातेवाईकांच्या नावे हे व्यवहार करण्यात आले होते का, ही बाबदेखील सक्तवसुली संचालनालयाकडून होणार चौकशीच्या रडारवर आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.